कामगार | मराठी कविता



आयुष्याची चिरीमिरी
पाटकुळी टाकून

भाकरीच्या शोधात
 निघालेल्या जीवांचे तुकडे
या समृद्ध देशाच्या
उरावर विखुरलेले बघून
आभाळालाही
आवरता आले नाही अश्रू
भुई थरथरत राहिली रातभर

मात्र त्यांची भाकरी 
हिरावून घेणाऱ्यांच्या 
काळजात काहीच हललं नाही
तेव्हा भाकरिनेच  खजील होत
माखून घेतलं  स्वत:ला
रक्ताने त्यांच्या
अन् घेतला आपल्यावर 
आरोप  हत्येचा 

@छाया बेले .


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .