“अमूक बाई खूप चांगली…” “ती कुणाच्या नजरेसही पडत नाही…” “कधी तिचा आवाज सुद्धा घराबाहेर ऐकू येत नाही…” “रस्त्यानं जाताना ती वर मान करून इकडं तिकडं बघत सुद्धा नाही…” या वाक्यांमध्ये केवळ कौतुक नसतं, तर एक अदृश्य अपेक्षा दडलेली असते. इतकंच नाही, एखाद्या बाईने आयुष्यभर सहन करत शेवटी आत्महत्या केली तरी तिच्या सहनशीलतेचं गौरविकरण केलं जातं— “आशिलाची लेक मरूनच गेली, पण कुणाला सांगितलं नाही… जिवंतपणी घराचा दरवाजा ओलांडून गेली नाही…” अशा प्रकारे तिच्या वेदनेचं, तिच्या चुप्पीचं, तिच्या सहनशीलतेचंही कौतुक केलं जातं. आणि या सगळ्यालाच “चांगली स्त्री” म्हणण्याची सवय आपल्याला लागलेली असते. मीही हेच ऐकत मोठी झाले. नकळत त्याचं अनुकरणही केलं. पण जसं जसं वाचन वाढत गेलं, तसं तसं मनात एक अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. हे सगळं नेमकं काय आहे? चांगली स्त्री असणं म्हणजे स्वतःला इतकं गमावणं आवश्यक आहे का? लहानपणी ऐकलेली एक साधी गोष्ट आजही मनात खोलवर रुजलेली आहे. एक सासू तिच्या नव्या सुनेबद्दल अभिमानाने सांगते—“माझी सून खूप नाजूक आहे, ती अर्धीच भाकरी खाते.” आणि त्या दिवसापासून ती सून खरंच अर्धी...
फारचं सुंदर...
उत्तर द्याहटवा