शेलकाट | मराठी लघुकथा

   //  शेलकाट//

       नुकत्याच उगवून आलेल्या सुर्याची कोवळी उन्हे गाव शिवारभर पसरल्यामुळे सगळं कसं  सोने ढाळल्यागत  भासत होतं . कोवळी किरणे रावसाहेबाच्या वाड्याच्या भिंती , बुरुज ओलांडून आवारात उतरून आली होती .

रावसाहेबाची  पत्नी जानकीबाई पुजेचं ताट घेउन  तुळशीची  पुजा करणयासाठी बाहेर येण्यासाठी एक पाय उंबरख्याच्या बाहेर टाकला .
औssssव ,   रावसाहेबाची बायको असल्याचा विसर पडला की काय .. ऑं.. ? 

रावसाहेबाचा नांवाज वाडाभर दुमदुमला  . तो आवाज ऐकून जानकीबाई जागेवरच थिजल्यासारखी उभी राहिली . आपली काय चुक झाली हेच तिच्या लक्षात येत नव्हते . म्हणून ती रावसाहेबाकडं  भित्र्या नजरेने कधी खाली कधी वर  बघत उभी होती . ते शेलकाट कुठं गेलंय , भान हाय का  ? आता नोकरचाकर कामाला येतील .. निघाली सगळ्याला तोंड दाखवत.. आमच्या घरच्या बाईचं नखही दुसऱ्या मानसाला दिसाया नगं .  कळलं काय? रावसाहेब लालबुंद डोळे जानकीबाईवर रोखून दम देत , होते दरडावत होते .  जानकीबाईने  बाहेर टाकलेला पाय आत घेवून पूजेचे ताट तांब्या खाली ठेवला .आणि शेलकाट ओढून चेहरा संपूर्ण चेहरा नीट झाकून घेतला. .थरथरत बाहेर येवून तुळशीची पुजा केली .  वाड्यात गडप झाली . राव‌साहेबाचा आवाज माडीवर प्रिया आणि जयेशच्या  खोजीपर्यंत स्पष्टपणे जात होता . 

"जयू.. काय हे  सतत  आबासाहेब आईच्या मागे लागून असतात तू काही बोलत का नाहीस.." प्रिया बेडवर उठून बसत नाराजीने म्हणाली. 
" अगं, या चालत  आलेल्या परंपरा आहेत. मी कसा काय बोलणार त्यांच्या विरोधात ? तू पण फार  लक्ष देऊ नकोस.. ओके  ? " जयेश प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाला . 
" ते तुला शक्य आहे हे, मला नाही, "प्रिया रागाने मानेला  देत उठली .
"  एखाद्याला किती दडपून टाकायचं.‌. जयू, त्या पण माणूस आहेत ना .‌.. " प्रियाच्या आवाजातला संताप स्पष्ट जाणवत होता . 
" प्रिया सोड ना यार,  मी आज माझ्या राणीला आमराईत फिरायला घेवून जातो ..‌.  "   प्रियाची कमजोर नस जयेश ओळखून होता . 
आमराईप नाव घेताच ती जगाला विसरते हे त्याना चांगलं माहित होत . 

" प्रिया घरी  सगळ्यासमोर मला अरे तूरे करत जाऊ नको ना प्लीज  " जयेश ती नरमल्याचा अंदाज घेत विनवणीच्या सुरात म्हणाला . 
तशी तीने नाराजीची त्याच्याकडे एक नजर टाकली 
"ये  खाली लवकर .. " असं म्हणून दाराकडे वळली . 

"येतो थोड्या वेळात तू तयार हो  मग आपण आमराईत जाऊ . " तो तिच्या पाठमो-या अकृतीकडे पाहात  तसाच पडून राहिला. 

 "या शहरातल्या पोरीला सम‌जावणं खरोखर अवघड काम आहे. "जयेशने डोक्यावर हात मारून घेतला.

दिवस डोक्यावर यायला अजून थोडा वेळ बाकी होता. जयेश आणि प्रिया आमराईतल्या एका मोठ्या झाडाच्या   थंडगार सावलीत विसावले होते .  हवेची थंड झुळूक अंगावर येऊन सुखावून जात होती. 
" जया तुला आठवतं का रे ,, कॉलेजच्या पहिल्या वर्षी तुझ्या वाढदिवशी आपला कॉलेजचा सगळा ग्रुपू इथं आला होता. त्यात मी पण होते .  तेव्हा आपण फक्त मित्र होतो... " प्रिया भूतभाळगत शिरून बोलत  होती.
  " सग्गळं आठवतं मला ..तेव्हाही तू मला आवडत होतीस."
जयेश तिच्या गालावरून बोट  फिरवत  म्हणाला. 
प्रिया गोड लाजली . 
" मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले ना , मी तेव्हाच इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडले होते .  इथनी झाडं, हे खूलं आकाश, स्वछंदपणे. आभाळभर उडणारी पाखरं,  मुक्तपणे फिरणारी जनावरं ,  सगळे कसे मोकळा श्वास  घेतात इथे , या हवेत . या उलट  शहरात अगदी श्वास कोंडायला होतो . " प्रियामानंदाने न्हावून निघाली होती. "अच्छा म्हणजे माझ्या नाहीतर इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडून लग्न केलय   मॅडमने. " जयेश तिची फिरकी घेत होता

"काही अंशी खरं आहे ते. "ती त्याच्या बोलण्याचं समर्थन करीत म्हणाली. यावर  दोघेही हसले . 

 वाऱ्याच्या झुळकेसोबत दबक्या आवाजात बाईच्या रडण्याचा आवाज येत होता .  ते ऐकून प्रिया अचानक सावध झाली 
 "जयेश तुला कसला  आवाज येतोय का ?  " प्रिया आवाजाचा कानोसा घेत म्हणाली . 

"पियू,  चांगला रोमॅंटिक मुड  खराब नको करु यार,,  तू फक्त माझ्याकडे  लक्ष दे प्लीज. " जयेश तिचं लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करीत होता.

" जयेश,   अरे ऐक ना .. बाईचा रडण्याचा समाज येतोय .. इथेच जवळपास कोणीतरी रडतंय..." आवाजाचा कानोसा घेत प्रिया उठून उभी राहिली  . 
" पिऊ .‌.. पिऊ ..‌ ऐक ना ..." जयेश अडवायच्या प्रयत्नात असतानाच प्रिया त्याने पकडलेला हात सोडवून आवाजाच्या दिशेने पाय टाकत निघाली . 
जयेशही  तिच्या पाठीमागून निघाला . 

बांधावर पोहचून प्रियाने खाली वाकून बघितलं आणि तोंडावर हात मारून घेतला. जयेश ते दृश्य बघून दचकला . 

 एक गरीब  स्त्री अंगाला झोंबणा-या रावसाहेबाच्या  पाया पडत होती . 

विनाणी करीत होती
 " मला सोडा हो मालक, मी तुमच्या पोरीवानी  हाय .. माझी बेअब्रू होईल .  जीवनातून उठन म्या " 
ती गयावया करांत होती . रावसाहेब ससाण्याने शिकार  पकडावी तसं तिला पकडून तिचा पदर खेचत  होता .  तो पदर तिच्या गळ्याला गुंडाळून तिचा श्वास गुदमरत होता .  प्रिया पुढे झेपावली  तसं  जयेश    तिला अडवण्यासाठी हात घरला . प्रिया बांधावरून खाली उतरून त्या बाईचा पदर झटक्याने सोडवला. तशी ती घाबरलेली बाई  पळत सुटली . 
 प्रिया त्या टाळ्या वाजवत  रावसाहेबाला म्हणाली -

आपल्या घराच्या बाईचं नखही   कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून डोक्यावरचं शेलकाट सरकूह न देणाऱ्या व्यक्तीला गोरगरीबाची बाई  नागडी करताना  काहीच वाटू  नये ? वाह रावसाहेब !! गावचे मायबाप , कारभारी ना तुम्ही ? 
तुमच्या चेह-यावरचं मोठेपणाचं   शेलकाट  गळून पडलंय  तुम्ही उघडे पडलात !! 

जयेशराव हीच काय तुमची महान परंपरा ?  श्शी....!!
 खूप दुषित आहे ही हवा ,  कित्येक बायकांचे गुदमरलेले श्वास  मिसळलेत  या हवेत. माझा दम कओंडतओय इथे 

नकोय मला हे शेलकाट.. नकोय. नकोय.... " प्रिया भान हरपून रानाने पळत सुटली . 


@ छाया बेले , नांदेड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .