पोस्ट्स

मराठी कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेलकाट | मराठी लघुकथा

इमेज
   //  शेलकाट//        नुकत्याच उगवून आलेल्या सुर्याची कोवळी उन्हे गाव शिवारभर पसरल्यामुळे सगळं कसं  सोने ढाळल्यागत  भासत होतं . कोवळी किरणे रावसाहेबाच्या वाड्याच्या भिंती , बुरुज ओलांडून आवारात उतरून आली होती . रावसाहेबाची  पत्नी जानकीबाई पुजेचं ताट घेउन  तुळशीची  पुजा करणयासाठी बाहेर येण्यासाठी एक पाय उंबरख्याच्या बाहेर टाकला . औssssव ,   रावसाहेबाची बायको असल्याचा विसर पडला की काय .. ऑं.. ?  रावसाहेबाचा नांवाज वाडाभर दुमदुमला  . तो आवाज ऐकून जानकीबाई जागेवरच थिजल्यासारखी उभी राहिली . आपली काय चुक झाली हेच तिच्या लक्षात येत नव्हते . म्हणून ती रावसाहेबाकडं  भित्र्या नजरेने कधी खाली कधी वर  बघत उभी होती . ते शेलकाट कुठं गेलंय , भान हाय का  ? आता नोकरचाकर कामाला येतील .. निघाली सगळ्याला तोंड दाखवत.. आमच्या घरच्या बाईचं नखही दुसऱ्या मानसाला दिसाया नगं .  कळलं काय? रावसाहेब लालबुंद डोळे जानकीबाईवर रोखून दम देत , होते दरडावत होते .  जानकीबाईने  बाहेर टाकलेला पाय आत घेवून...

सर्पिन | मराठी कथा

इमेज
                       // सर्पिन //          तू मला सर्पिन हे नाव दिल्याचं गंगुआत्यानं त्याच दिवशी फोनवर सांगितलं. मला याचं फार काही वाटलं नाही , वाईट वाटण्याची किंवा खेद करण्याची संवेदनाच नष्ट झालीय . ती संवेदना जागृत असती तर या सिकलसेल सारख्या आतल्याआत भळभळत्या जखमांच्या वेदना एकाकी काळजाने कशा सहन केल्या असत्या ??       तसं तर तुझं सगळंच माझ्यासाठी महत्वाचं आहे . तू दिलेलं सर्पिन हे नावही शेवटपर्यंत काळजात राहून जाईल, जसं आतापर्यंत तुझं सगळंच जपत आले तसं . तुझी बायको, तुझा नवा संसार, तुझ्या सासरवाडीच्या लोकांचंही माझ्या सासरी मी अगत्याने स्वागत केलंय . बायका कुत्सितपणे हसायच्या . हिच्या दुसऱ्या आईचे भाऊ आलेत असं कुजबुजायच्या . बाईच्या बापानं तीन नातवंडं झाल्यावर म्हातारपणी लग्न केलंय असं म्हणायच्या .  माझी सासूही येता जाता टोमणे मारायची . मला टोमणे मारण्यासाठी सासरी आता अजून एक वेगळं कारण सापडलं होतं . सगळ्या कारणांच्या मुळाशी तूच असल्याने मला काही फरक पडला नाही ....

कोरोनानायक | मराठी कोरोना कथा

इमेज
     *कोरोना काळ - एका नायकाची गोष्ट* कोरोना काळ हा जगाच्या इतिहासात एक अंधारयुग म्हणून काळ्या अक्षरात नोंदला गेला आहे. या काळाने मृत्यूचे एक भयावह रूप जगासमोर आणले. घरादाराचे सांदीकोपरे या मृत्यूने आपल्या कवेत घेतले होते. माणूस स्वतःपासून दुरावला होता. आपल्या शरीराला तो स्पर्श करू शकत नव्हता, कारण अदृश्य रूपातला मृत्यू आपल्या कपड्यावर कुठे दबा धरून बसला असेल सांगता येत नव्हते. मनमोकळेपणाने श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हता. "जीवन क्षणभंगुर आहे" हे वाक्य आपण नेहमी बोलतो, ऐकतो. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव या कोरोना काळाने दिला. या काळाने अनेक कुटुंबे गिळंकृत केली. कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाची बहीण, कुणाचा भाऊ, कुणाची पत्नी, कुणाचा पती, कुणाचे मूल डोळ्यादेखत हिरावून घेतले आणि माणूस आपल्या प्रियजनांचा मृत्यू हतबल होऊन बघत राहिला. लहानपणी आपण एका राजकुमाराला मृत्यूपासून वाचवण्यासाठी काचेच्या खोलीत बंदिस्त केल्याची कथा ऐकली असेल. तशीच एक मृत्यूपासून वाचवणारी खोली त्या काळात प्रत्येकजण शोधत होता. माणूस माणसापासून दूर पळत होता. आप्त, मित्र, परिवार या सगळ्यांपास...

किराळ : ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन | पुस्तक परिचय

इमेज
        किराळ - मातीत रुजलेला अस्सल ग्रामीण जीवनानुभव  ग्रामीण जीवनाचे अस्सल चित्रण करणारा शेती मातीतील माणसाचं जीवन दर्शन घडवणारा प्राध्यापक यशवंत माळी यांचा साहित्याक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलेला किराळ हा कथासंग्रह शेती मातीतील माणसाचा जगणं, त्यांचा संघर्ष लेखकाने या कथासंग्रहातून मांडला आहे. अस्सल जीवनानुभव, अस्सल ग्रामीण भाषा यामुळे किराळ हा कथासंग्रह वेगळा ठसा उमटवून जातो. जागतिकीकरणामुळे ग्रामीण संस्कृती एकूणच ग्रामीण पर्यावरण प्रभावित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण साहित्यावरही याचा परिणाम होऊन अस्सलता हरवल्यासारखी वाटते. खेड्यातील मुले शिकली नोकरी-व्यवसायानिमित्त शहराकडे स्थलांतरित झाली. ती लिहिती झाली. आपला जगणं आपला संघर्ष साहित्याच्या माध्यमातून चित्रित करत असली तरीही त्यात शहरी आणि ग्रामीण अशी सरमिसळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर आलेला यशवंत माळी यांचा किराळ हा कथासंग्रह अस्सल ग्रामीणत्व घेऊन आलेला असल्यामुळे या कथासंग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त होते. किराळ कथासंग्रहाच्या पहिल्याच कथेतून लेखकाच्या भाषेवरील प्रभ...

| इस्कोट | मनश्री आर्ट द्वारा आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त मराठी कथा

इमेज
 //  इस्कोट //        "आट दिसापासून धोध्धारर लागून बसलाय.. घरात दाना न्हाई..घरातले  उंद्र  दिक्कील पळून गेले.. म्या कुठ जाऊ ह्या चिंगीला घेऊन ? चापला पैसे धाडून देत व्हता.. ते बी न्हाई आले .. आता काय खाऊ घालू ह्या परदिशी जीवाला..? ना माय ना बाप.. माझ्या म्हातारीच्या जीवावर टाकून गेले... निराधार म्हणून पैसे देत होते आता सगळंच बंद हाय .. काय खावाव गरिबांनं.. गावातून काही मागून आन्ल आस्त..व्हळ भरून चाल्लंय " घमसू म्हातारी.. झोपडीच्या दारातून बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडं बघून चरफडत स्वतःशीच बोलत होती.    पाऊस आपल्याच धुंदीत निर्दयपणे कोसळत होता.त्याचा तांडव बघून  सगळेच जीव दबा धरून बसले होते.  " भातल.. " ' चिंगीच्या आवाजाने घमसू तंद्रीतून बाहेर आली. काय खाऊ घालू गं माय  तुला ? भाकर,, भाकर लावलीस एकच.. कुठून आनू भाकर तुला ?" कातडीं झाकलेले दोन हाडाचे  सांगाडे झोपडीत भुकेने व्याकुळ झाले होते. चिंगीच्या हातापायाच्या सलमकाड्या झाल्या होत्या.डोळ्याची बुबळं फाकली होती.. छातीची बारीक सारीक सगळी हाडं उघडी पडली होती..ं के...

मराठी कथा / पेरणी

इमेज
।।  पेरणी ।। रोहिणी नक्षत्र थोडं झिरपलं. शेतकऱ्याला पेरणीचे वेध लागले. सगळीकडे लालबुंद फुलासारखे किडे फिरू लागले. बाया सगळ्या त्यांना मृग घेऊन येणारे किडे म्हणून हळद कुंकू लावून पाऊस पडू दे म्हणून पाया पडू लागल्या . "पाऊस पडतो मिरगा आधी रोहिणीचा पाळणा हलतो भावा आधी बहिणीचा" पहाटे जात्यावर दळताना बाया ओव्या म्हणू लागल्या. सगळे शेतकरी  मृगाचा पाणी पडताच पेरणी करावी म्हणून सगळी तयारी करून बसले होते. सटवा आपली तीन गुंठे जमीन पेरण्यासाठी घरातील डाळ दाना विकून बी -बियाणे  घेऊन आला. तर  नामूनं एकरभराच्या पेरणीसाठी बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून बियाणं आणलं. शेवंता बरेच दिवस आदळआपट करीत राहिली . मात्र तिलाही कळत होतं दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून मग काही दिवसांनी शांत झाली . महादुला पाच एकराची पेरणी करायची होती. म्हणून त्यांन सोयाबीन न वीकता तसंच लावून ठेवलं होतं पेरणीसाठी. ते सोयाबीन कुंभाराच्या गाढवावर लादून सावकाराकडं घेऊन गेला सावकारांन वजन काटा केला. आता भाव पडलाय म्हणून अर्ध्या किमतीत सोयाबीन घेतलं. महादुला हळूहळू आपला जीव कोणीतरी काढून घेत...