मनाचा ठाव घेणारी कादंबरी 'पारबता'-बसवंत घेवारे
==================
आपली पारबता कालच मिळाली व ती आत्ताच वाचून संपली.आपण कादंबरीत वर्णन केलेली गावे डोरनाळी भेंडेगाव,बिल्लाळी,खड्का, उदगीर ही सर्व गावे माझ्या पूर्ण परिचयाची आहेत.कारण मी सुद्धा त्याच भागातील म्हणजे जीरगा येथील राहणारा आहे. तसेच मी मराठवाडा ग्रामीण बँकेत मुक्रमाबाद व उदगीर शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीत होतो. आपण या कादंबरीत जी भाषा वापरली ती मला पूर्ण परिचित आहे.
पूर्ण कादंबरी वाचताना त्यातील सर्व पत्र माझ्या परिचयाची वाटली ,नव्हे ही घटना माझ्यासमोरच घडली असेच वाटते.खूपच वास्तववादी वाटते ग्रामीण भागातील महिलांचे सर्व प्रश्न यात मांडले.मनाचा ठाव घेणारी व मनाला भिडणारी कादंबरी वाटली .काही वेळा तर मन सुन्न झाले.कादंबरी चा शेवट नायिका आत्महत्या करते असे वाटत होते परंतु तुम्ही शेवट वेगळाच केलात आणि ते योग्यच केलात.
ही कादंबरी म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचे कष्ट, त्यांचे समाजातील स्थान, व त्यांच्यावर होणारे सतत अन्याय त्यांचा शोषिक पना. दर्शवते.परंतु ती कधी पेटून उठत नाही बंड करीत नाही .महिलाच कशा प्रकारे महिलांवर अन्याय करतात.असेच दिसते.
मला मनापासून आवडलेल्या पैकी सरोत्कृष्ट कादंबरी वाटली नव्हे सत्यकथा वाटली.तुमचे खूप खूप खूप अभिनंदन. व पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा.
मी माझे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे नाव जमाखर्च आयुष्याचा असे आहे.
बसवंत घेवारे
सेवानिवृत बँक अधिकारी
महाराष्ट्र ग्रामीण बँक
लक्ष्मी नारायण नगर तरोडा bk नांदेड 431605
मोबाईल 9922582905
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा