पोस्ट्स

sahitya लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्त्री जीवनाचे जळजळीत वास्तव - पारबता | लेखिका- छाया बेले | समीक्षा -विमल शेंडे

इमेज
  छाया बेले लिखित पारबता या कादंबरीची विमल शेंडे यांनी केलेली समीक्षा       बेले यांनी लिहिलेली ग्रामीण बोलीभाषेतील कादंबरी पारबता  स्त्रियांच्या वेदनेचं तिच्या आतल्या  घुसमटीचं वास्तव मांडणारी कादंबरी आहे. नागरी भागातून लग्नानंतर  ग्रामीण भागात  आलेली व   प्राथमिक शिक्षण झालेली  पारबता जिचा शेतीच्या कामाशी काहीही संबंध नसतो.  ती सासरी राबराब राबते . घरकाम, शेतीचे कामं सारी कसरत करताना ती दमते हे कोणाच्याही लक्षात येत नाही .  तीही ते आपलेच कर्तव्य आहे असे समजून विना तक्रार राबत राहते.   खरे तर स्त्री आणि पुरुष कुटुंब व्यवस्थेच्या समाज रथाची दोन चाक आहेत लग्नानंतर नवतीचे नऊ दिवस म्हणून तिचे कौतुक केले जाते पण एकदा अंगावरची हळद पुसट झाली की स्त्री नावाचे दुसरे चाक सततच घासले जात असते. समाजाने घालून दिलेले नियम, रूढी, परंपरा , लोकलज्जा, संकोच हे सारं पुरुष सत्ताक पद्धतीने तिच्यावर लादलेलं ओझ ती वाहत असते. खरे तर ती कुटुंबाची काळजीवाहू सरकारच असते त्याबदल्यात तिच्या वाट्याला जो मोबदला येतो ते केवळ ति...

आत्मनिष्ठ हुंकाराचा वैश्विक अविष्कार:माधव कौशिक यांची निवडक कविता !!

इमेज
आत्मनिष्ठ हुंकाराचा वैश्विक अविष्कार:माधव कौशिक यांची निवडक कविता छाया बेले नांदेड सर्वभाषा पब्लिकेशन नवी दिल्ली यांनी माधव कौशिक यांची निवडक कविता(२०२५) हे बाळासाहेब लबडे यांनी हिंदीतुन मराठीत अनुवादित केलेले पुस्तक आहे. याची अर्पण पत्रिका मला मनापासून आवडली. कविता असो किंवा कोणत्याही प्रकारचे लिखाण असो , माणसाच्या जगण्याला आधार देणारी , सगळ्यात आधी मानवाला केंद्रस्थानी ठेवणारी साहित्यकृती ही एक स्वयंप्रकाशी नीती असते. धर्म, जात, पंथ, लिंग किंवा कोणत्याही प्रकारचे शोषणाच्या बुडाला आग लावणारे साहित्य हेच खरे साहित्य असते.याच कुळातील ' माधव कौशिक यांची निवडक कविता ' हा डॉ. बाळासाहेब लबडे यांनी अनुवादित केलेला कविता संग्रह नुकताच वाचनात आला. याची हिंदी आवृत्तीही वाचली .  मराठी वाचकांसाठी देश विदेशातील साहित्याचे दालन खुले करून देण्याचा अनुवाद हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे .  डॉ. बाळासाहेब लबडे यांनी हे काम अगदी तंतोतंत पार पडले आहे .  कवितेचा आशय नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोहोचलेला आहे.  या कविता संग्रहातील पहिल्याच कवितेत समकालीन भवतालचा नेमका वेध घेतला आहे. "...

मानवी शोषणाविरुद्धचा करुण आक्रोश - हार्ट लॅम्प | बुकर पुरस्कार विजेता कथासंग्रह

इमेज
मानवी शोषणाविरुद्धचा करुण आक्रोश - हार्ट लॅम्प | बुकर पुरस्कार विजेता कथासंग्रह  लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथा संग्रहाला बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले, ही भारतीय भाषांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार एका स्त्री लेखिकेला मिळावा, हे त्याहूनही अधिक अभिमानास्पद आहे. लेखिका बानू मुश्ताक यांचे हार्दिक अभिनंदन! या कथा संग्रहात स्त्री जीवनाची अतिशय बारकाईने आणि तेवढ्याच संवेदनशीलतेने चिकित्सक मांडणी केलेली आहे. साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. त्या आरशातील प्रतिबिंब हे समोर उभ्या केलेल्या चित्रावर अवलंबून असते. ते चित्र जेवढे अस्सल असेल, तेवढे प्रतिबिंबही स्पष्ट असेल, हेही तितकेच खरे. समाज, जात, धर्म हे त्या व्यक्तीच्या ‘स्व’ अस्तित्वानंतर येते. लेखिकेने समस्त स्त्री ‘स्व’ चे जगणे, तिचे शोषण, नात्यातील खोटारडेपणा, तिच्याप्रतीचे सामाजिक दंभ, मानवी व्यवहार, वृत्ती हे सगळे धीटपणे मांडले आहे. ‘कुठेही गेलं तरी पळसाला पानं तीनच’ - ‘हार्ट लॅम्प’ वाचत असताना या म्हणीचा प्रत्यय घडोघडी येतो.  शाहिस्ता महालासाठी संगमरवरी लादी : पह...

मनाचा ठाव घेणारी कादंबरी 'पारबता'-बसवंत घेवारे

इमेज
मनाचा ठाव घेणारी कादंबरी 'पारबता'- श्री. बसवंत घेवारे यांचा पारबतावरील अभिप्राय.  ================== आपली पारबता कालच मिळाली व ती आत्ताच वाचून संपली.आपण कादंबरीत वर्णन केलेली गावे डोरनाळी भेंडेगाव,बिल्लाळी,खड्का, उदगीर ही सर्व गावे माझ्या पूर्ण परिचयाची आहेत.कारण मी सुद्धा त्याच भागातील म्हणजे जीरगा येथील राहणारा आहे. तसेच मी मराठवाडा ग्रामीण बँकेत मुक्रमाबाद व उदगीर शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीत होतो. आपण या कादंबरीत जी भाषा वापरली ती मला पूर्ण परिचित आहे. पूर्ण कादंबरी वाचताना त्यातील सर्व पत्र माझ्या परिचयाची वाटली ,नव्हे ही घटना माझ्यासमोरच घडली असेच वाटते.खूपच वास्तववादी वाटते ग्रामीण भागातील महिलांचे सर्व प्रश्न यात मांडले.मनाचा ठाव घेणारी व मनाला भिडणारी कादंबरी वाटली .काही वेळा तर मन सुन्न झाले.कादंबरी चा शेवट नायिका आत्महत्या करते असे वाटत होते परंतु तुम्ही शेवट वेगळाच केलात आणि ते योग्यच केलात. ही कादंबरी म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचे कष्ट, त्यांचे समाजातील स्थान, व त्यांच्यावर होणारे सतत अन्याय त्यांचा शोषिक पना. दर्शवते.परंतु ती कधी पेटून उठत न...