स्त्री जीवनाचे जळजळीत वास्तव - पारबता | लेखिका- छाया बेले | समीक्षा -विमल शेंडे

  छाया बेले लिखित पारबता या कादंबरीची विमल शेंडे यांनी केलेली समीक्षा 
 


   बेले यांनी लिहिलेली ग्रामीण बोलीभाषेतील कादंबरी पारबता 
स्त्रियांच्या वेदनेचं तिच्या आतल्या  घुसमटीचं वास्तव मांडणारी कादंबरी आहे.
नागरी भागातून लग्नानंतर  ग्रामीण भागात  आलेली व   प्राथमिक शिक्षण झालेली  पारबता जिचा शेतीच्या कामाशी काहीही संबंध नसतो. 
ती सासरी राबराब राबते . घरकाम, शेतीचे कामं सारी कसरत करताना ती दमते हे कोणाच्याही लक्षात येत नाही .  तीही ते आपलेच कर्तव्य आहे असे समजून विना तक्रार राबत राहते. 
 खरे तर स्त्री आणि पुरुष कुटुंब व्यवस्थेच्या समाज रथाची दोन चाक आहेत लग्नानंतर नवतीचे नऊ दिवस म्हणून तिचे कौतुक केले जाते पण एकदा अंगावरची हळद पुसट झाली की स्त्री नावाचे दुसरे चाक सततच घासले जात असते. समाजाने घालून दिलेले नियम, रूढी, परंपरा , लोकलज्जा, संकोच हे सारं पुरुष सत्ताक पद्धतीने तिच्यावर लादलेलं ओझ ती वाहत असते. खरे तर ती कुटुंबाची काळजीवाहू सरकारच असते त्याबदल्यात तिच्या वाट्याला जो मोबदला येतो ते केवळ तिचे मानसिक शारीरिक आणि बौद्धिक शोषण .  आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती मौनच धारण करते.
 ज्याच्या खांद्यावर डोकं टाकून मन हलकं करावं त्या जोडीदाराचे खांदेही समाज बंधनाचे गुलाम असतात. स्त्रीलाही तिच्या अस्तित्वाची जाण नसते.
 सामाजिक भय सतत तिचा पाठलाग करत असते.
 रूढी परंपरेने बांधून घेतलेली ती स्वतःचा बळी देते.
 हे जग सोडून जाताना तिच्या सरणावरही ती वेदनेचं गाठोडं घेऊनच उभी असते.
 त्या राखेतून उडणारी राख पुढच्या पिढीलाही गुलामीत  अडकण्याची सूचना देते . लग्न म्हणजे काय असतं हे कळण्याआधीच्या वयातच तिला पुरुषाच्या हवाली केले जाते . 
आपण कर्तव्यातून मुक्त झालो असे आई-वडिलांना वाटत असले तरी मुलीच्या उज्वल भवितव्याचा विचार  
त्यांना कधी येत नाही .
समाजव्यवस्थेचे तेही शिकार झालेले असतात . 
ग्रामीण भागात अजूनही एक म्हण  आहे 
' विकली गाय तिच्या आशा काय ' एक प्रकारे मुलीच्या आयुष्याचा हा अलिखित करार केला जातो. हाडामासाच्या स्त्रीचा समाज लिलावच करतो.     
      लेखिकेने घर आणि बहुताल अनुभव अनुभवल्याचे चित्रण या कादंबरीत केले आहे . सामाजिक परंपरांचा वास्तविक म्हणजे पारबता कधी दृश्य तर कधी अदृश्य रुपात अनेक  पारबता स्वतःचं अस्तित्व न शोधता सासरची माणसं शेजारीपाजारी यांच्याशी एक रूप होतात. सागराला मिळताना नदीच्या प्रमाणे आपलं अस्तित्व विसरून त्या प्रवाहात एकरूप होते . आयुष्याच्या उत्तरार्धात  तर ती जिवंत असूनही  रोजचं सामाजिक मरण जगत असते . 
तिच्या संवेदनशील मनाला ते दुःख पचवण्याचं अपमान सहन करण्याचं जणू प्रशिक्षण देत असते .
अनेक दुःख , यातना , अपमान गिळून सुखात असल्याचं माहेरच्यांना शेजाऱ्यांना भासवत  असते . माहेरपण दिवाळीसण हे मोहरण्याचे हुंदडण्याचे दिवस पण मैत्रिणींशी मनसोक्त गप्पा मारणे 



  छाया बेले यांनी लिहिलेली ग्रामीण बोलीभाषेतली कादंबरी पारबता 
स्त्रियांच्या वेदनेची तिच्या आतल्या घुसमटीच वास्तव मांडणारी कादंबरी आहे.
नागरी भागातून लग्नानंतर ग्रामीण भागात आलेली व प्राथमिक शिक्षण झालेली पारबता जिचा शेतीच्या कामाशी काहीही संबंध नसतो. 
ती सासरी राबराब राबते . घरकाम, शेतीचे कामं 

पारबता - कादंबरी 
लेखिका - छाया बेले 
प्रकाशक- यशोदिप पब्लिकेशन्स पुणे
मुखपृष्ठ - राजू बाविस्कर 
पृष्ठे - २४०
किंमत -३५० रुपये
 - विमल शेंडे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .