पोस्ट्स

Marathi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्त्री जीवनाचे जळजळीत वास्तव - पारबता | लेखिका- छाया बेले | समीक्षा -विमल शेंडे

इमेज
  छाया बेले लिखित पारबता या कादंबरीची विमल शेंडे यांनी केलेली समीक्षा       बेले यांनी लिहिलेली ग्रामीण बोलीभाषेतील कादंबरी पारबता  स्त्रियांच्या वेदनेचं तिच्या आतल्या  घुसमटीचं वास्तव मांडणारी कादंबरी आहे. नागरी भागातून लग्नानंतर  ग्रामीण भागात  आलेली व   प्राथमिक शिक्षण झालेली  पारबता जिचा शेतीच्या कामाशी काहीही संबंध नसतो.  ती सासरी राबराब राबते . घरकाम, शेतीचे कामं सारी कसरत करताना ती दमते हे कोणाच्याही लक्षात येत नाही .  तीही ते आपलेच कर्तव्य आहे असे समजून विना तक्रार राबत राहते.   खरे तर स्त्री आणि पुरुष कुटुंब व्यवस्थेच्या समाज रथाची दोन चाक आहेत लग्नानंतर नवतीचे नऊ दिवस म्हणून तिचे कौतुक केले जाते पण एकदा अंगावरची हळद पुसट झाली की स्त्री नावाचे दुसरे चाक सततच घासले जात असते. समाजाने घालून दिलेले नियम, रूढी, परंपरा , लोकलज्जा, संकोच हे सारं पुरुष सत्ताक पद्धतीने तिच्यावर लादलेलं ओझ ती वाहत असते. खरे तर ती कुटुंबाची काळजीवाहू सरकारच असते त्याबदल्यात तिच्या वाट्याला जो मोबदला येतो ते केवळ ति...

समष्टीच्या कल्याणाच पसायदान मागणारी आभाळमाया!!

इमेज
समष्टीच्या कल्याणाच पसायदान मागणारी आभाळमाया!! यावर्षीचा बालसाहित्याचा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक, आचार्य डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला मिळाला.  एखाद्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी मिळते तेव्हा , सगळ्या साहित्यप्रेमींचं लक्ष त्याकडे वेधले जाते.  त्या साहित्य कृतीचे नेमके काय विशेष असेल याची वाचकांना उत्कंठा लागून राहते. याच उत्कंठेपोटी मी ही साहित्यकृती बरीच शोधाशोध करून मागवली व ती मनापासून भावली.     आभाळमाया मधून अवघा निसर्गच आपल्या समोर अवतरतो . झाडे, वेली, फळं, फुलं व निसर्गातील सर्व घटक साधेपणाने, परोपकारी जीवन जगण्याची कशी शिकवण देतात याची सुरेख  मांडणी डॉ. सुरेश सावंत यांनी केली आहे.  जेव्हा मला रडायला येतं  तेव्हा झाड अश्रू ढाळतं  जेव्हा मला आनंद होतो  तेव्हा झाड फुलं माळतं  माझ्या मनातील भावना  झाडाला बरोबर कळतात  माझ्या भुकेच्या वेळेला  झाडाची पिकली फळं गळतात     निसर्गाच्या ठायी असलेली उदारता, त्याच्यातील दातृत्वभाव निस्वार्थीपणे माणसाला सर्व काही देणाऱ्या झा...

सलाम करते इथे लाखदा माणुसकिला !!

इमेज
सलाम करते, इथे लाखदा माणुसकीला दगड कोणता पुजने मजला जमले नाही कारल्याच्या जातकुळिचा आळही मजवर ओठांवरती सजणे मजला जमले नाही खुरटे जगणे भले कितीही जिरायतीचे   अमरवेलीसम रूजणे मजला जमले नाही आत्मभानाच्या आगीत जळणे कबूल आहे झुळकेसरशी विझणे मजला जमले नाही काळजाला काळीज देणे जमते तरीही स्वार्थासाठी भजने मजला जमले नाही @छाया बेले, नांदेड.