पोस्ट्स

अमृता प्रीतम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अमृता प्रीतम व इमरोज यांच्या प्रेमाची अमर कहाणी ‘ती आहेच’ | पुस्तक परिचय – छाया बेले

इमेज
अमृता प्रीतम व इमरोज यांच्या प्रेमाची अमर कहाणी ‘ती आहेच’ - पुस्तक परिचय -छाया बेले उमा त्रिलोक यांच्या ‘अमृता इमरोज : ए लव्ह स्टोरी’ या पुस्तकाचा ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केलेला अनुवाद, ‘ती आहेच’ (अमृता प्रीतमच्या नंतरचे इमरोज) हे पुस्तक अलिकडेच वाचनात आले.  निखळ निर्मितीक्षम आणि उत्साहाचे, आनंदाचे सहजीवन व्यतीत करणे, हा खरा पुरुषार्थ. हे खरं प्रेम. एकमेकांवर मालकी हक्क न गाजवता, आपापल्या कामात गढून जात, एकमेकांची मनं सांभाळत उत्तम जगता येतं हेच इमरोज सांगून गेले आहेत. आजच्या स्त्री-पुरुषांना हे कळावं, अशी माझी आंतरिक तळमळ. 'प्रेम' या अडीच अक्षरांचा खरा अर्थ प्रत्येक माणसाला कळत गेला, तर जीवन सहज सुंदर होईल. ते तसे व्हावे, ही इच्छा. म्हणून हे लेखन.- वृषाली किन्हाळकर   (मनोगतातून)       अमृता प्रीतम - इमरोज हे कायम सर्वांच्या आकर्षणाचा विषय आहेत. याचं कारण त्यांचं एकमेकांवरील प्रेम तर आहेच, त्यापेक्षाही शंभर वर्षांपूर्वी त्यांनी व्यवस्थेची हुकुमशाही धुडकावून लावत प्रेमासाठी केलेला विद्रोह हेही एक कारण आहे!     ...

अम्रुता प्रितम | मराठी कविता

इमेज
अम्रुता प्रितम सहजच तुला वाचायला घेतलं... अन् वाचता वाचता कधी माझ्यात सामावलीस कळलच नाही तू कबरीतून जिवंत झालीस का मला कबरीतून जिवंत केलस कळत नाही... तुझ्यातील आगीने ध्वस्त केल्या अनेक तटबंद्या सुर्यानेही तुझ्या कडूनच आग  घेतलीय म्हणे प्रखर होण्यासाठी मानवता आणि स्वातंत्र्याचा अर्थ समजावण्यासाठी कुठल्यातरी वेगळ्याच जगातून आली असावीस असं वाटतं अनेक वेळा चढवलं गेलं तुला क्रुसावर तरीही गात राहिलीस मानवतेचं गीत तुझी प्रत्येक ओळ कबीराच्या दोह्याचा अर्थ सांगून जाते तू जगलीस केवळ सत्य आणि सत्य हे नसतं एवढं सोपं सुंदर स्त्री देहावरील मांसाच्या गोळ्यात खिळल्या अनेक नजरा तुझ्यातला बुद्ध पाहता आला नाही कुणालाही तू पाहिलास विध्वंस आत आणि बाहेर तरीही शिंपडत राहिलीस आब-ए-जमजम  तुझ्या शब्दांतून जगावर खाली येताना हीरने दिलं असावं अमानत म्हणून तिचं प्रेम तुझ्याकडे दुप्पट्यात गुंडाळून म्हणूनच काळ्या फुलांच्या बागेतही जपलास एक लाल गुलाब जिवापाड ®© छाया बेले नांदेड ✍🏼