पोस्ट्स

सामाजिक प्रश्न लेबलसह पोस्ट दाखवत आहे

समाजातील व्यसनाधीनता व त्यात होरपळणारे स्त्री जीवन

इमेज
समाजातील  व्यसनाधीनता व त्यात होरपळणारे स्त्री जीवन       नुकत्याच जाहीर झालेल्या इंजिनिअरिंगच्या देश पातळीवर परिक्षेच्या निकालात एक मुलगा देशात सातवा आला.  आता अनेक मुलं येत असतात यात काय नवल असं वाटू शकतं. याचं वेगळेपण असं की, या मुलाच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची.  हातावरचं पोट. त्यातच वडिलांना दारूचं भयंकर व्यसन.  या मुलाची आई मोलमजुरी करून दोन मुलं, नवरा,सासू सासरे एवढ्यांचं पोट भरत होती. घरात सतत भांडणं. अशा परिस्थितीत ही मुलं शिकतील असा विचारही मनात  येणं शक्य नाही.     चार वर्षांपूर्वी या मुलाचे वडील एक दिवस दारू पिऊन मरून पडले. तेव्हापासून हे कुटुंब कसं आहे याची माहिती नव्हती. मात्र अचानक  आज या मुलाने देशात रॅंक काढला. आणि आश्चर्याचा धक्का बसला.      वडील असते तर तो हे यश कदाचित मिळवू शकला नसता असा विचार मनात येऊन गेला   ( खरं तर असा विचार मनात यायला नको होता)   कारण व्यसनाधीन झालेली माणसं त्यांच्या सहवासातील लोकांना विकासासाठी संधीच देत नाहीत. तेवढा वेळ मिळू देत नाहीत. ते...

आधुनिक दास्याची रूपं (भाग-२)

इमेज
आधुनिक दास्याची रूपं (भाग-२)                    आजची दासप्रथा भूतकाळातील साखळदंड, बाजारपेठा आणि उघड गुलामगिरीसारखी स्पष्टपणे दिसत नाही. तीने आपलं स्वरूप बदलले आहे. ती आता  रूपाने सूक्ष्म, स्वरूपाने अदृश्य, प्रभावाने अधिक खोलवर गेलेली आहे. आधुनिक समाजात स्त्रीला उघडपणे कैद केलेलं नसतं, पण तिच्या आयुष्याभोवती अशा मर्यादा विणल्या जातात की तिचं स्वातंत्र्य अपूर्ण राहतं.  म्हणूनच या आधुनिक दास्याची ओळख होणं,  ती पटवणं कठीण आहे . कारण ती दैनंदिन जीवनात इतकी मिसळलेली आहे की,  ती अनेकदा नैसर्गिक वाटू लागते.      या ' दास्याची' रचना समजून घेण्यासाठी तिच्या तीन महत्त्वाच्या स्तरांकडे पाहणं आवश्यक आहे.रचनात्मक, सांस्कृतिक आणि मानसिक. हे तीन स्तर वेगवेगळे नसून एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकत्रितपणे स्त्रीच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. रचनात्मक (संरचनात्मक) असमानता : व्यवस्थेतील अदृश्य भिंती रचनात्मक असमानता म्हणजे समाजातील संस्था, नियम आणि व्यवस्था ज्या पद्धतीने कार्य करतात, त्यात ही  विषमता, असमानत...