मुक्तीच्या शोधात | मराठी कविता
धावतेय मी
आयुष्याच्या धावपट्टी वर
नगण्य अस्तित्वाची
भारवाही होवून...
निद्रिस्त जाणिवांना
आलेलं आत्मभान
धडका घेत राहण
भिंतीवर..
शोध घेत राहतं
उजेडांच्या कवडश्यांचा
या अंधारयुगाची
खंत सलते जाणिवांना
अदृश्य शृंखलाच्या
कुठल्या निखळून
पडल्याचे भास
होताहेत मनाला
अस्वस्थतेच्या कृष्णविवरात
गुदमरतोय जीव..
आतून एक
हलकासा आक्रोश
कानावर येतोय
मुक्ती... मुक्ती... मुक्ती !!
छाया बेले.
खूप सुंदर...मुक्त भावना व्यक्त झाली आहे...!
उत्तर द्याहटवाखूप सुंदर...मुक्त भावना व्यक्त झाली आहे...!
उत्तर द्याहटवाधन्यवाद !!
हटवाअप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद !!
हटवा