पोस्ट्स

समिक्षा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जगणं बारकाईने टिपणारी श्रीनिवास मस्के यांची कविता.

इमेज
       बाईचा दस्तऐवज या कविता संग्रहाच्या निमित्ताने लिहिलेला अभिप्राय  श्रीनिवास मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा पोस्ट करीत आहे.         बरडशेवाळा ता.हदगाव या छोट्याशा गावात जन्मलेले कवी श्रीनिवास मस्के हे नव्या पिढीतील महत्वाचे व ग्रामीण कवीता दमदारपणे लिहिणारे कवी आहेत . एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व , सुप्रसिद्ध कवी,  व्याख्याते म्हणून सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो . त्यांच्या मंचीय कविता श्रोत्यांच्या मनावर गारूड करतात . कवी , वक्ते , विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक. अशा अनेक भुमीका पार पाडत समाजासाठी आपलं योगदान देत आहेत . त्याचबरोबर त्यांच्या ठायी एक निखळ माणूसपण वास करते. श्रीनिवास मस्के यांनी आपल्या कवितेतून गावभुईचं समग्र जीवन , तिथलं जगणं , तिथली हिरवळ , उन्हं, पाऊस सगळंच उगवून आणतात . त्याच बरोबर खेड्यातील कष्टकरी बाईचं जगणं जेवढं आत्मियतेने मांडतात. त्यांच्या शब्दात समग्र समष्टीविषयीचा जिव्हाळा दिसून येतो.          तो कासऱ्याचा दोर करतो               ...

पारबता या कादंबरी वरील,संगिता चिंचवड पुणे यांचा अभिप्राय| समिक्षा

इमेज
एक भाकर तीन चुली या कादंबरीचे सुप्रसिद्ध लेखक देवा झिंजाड सर  यांचं स्टेटस बघून पुण्यातील संगीता यांनी पारबता मागवून घेतले , लगेच अभिप्राय लिहून पाठवाला. असे वाचक शब्दांना बळ देतात.  धन्यवाद मॅडम!! _________________________ नमस्कार मॅडम, पारबता पुस्तक वाचलं वाचायला घेतलं की ठेवावं असं वाटत नाही. पारबाताच कष्ट आणि जिद्द नवऱ्याबरोबर असलेले नाते मुलीचा सांभाळ फार उत्कृष्ट असा प्रवास मांडलेला आहे. पूर्वीच्या काळी एका स्त्रीच्या पोटी मुलगी म्हणजेच स्त्री जन्माला येणं फार मोठा गुन्हा होता जावा सासू या पण आपण पण एक स्त्री आहोत बाई आहोत हे विसरून सुनेचा छळ करायच्या हे काही कुणाच्या हातात असत कां मेडिकल सायन्स चा काही संबंधच नव्हता. मुलगी थोडंफार शिकलेली असणं देखणी असणं हे तर खूप मोठं पाप होत. फक्त कष्टाला न बोलता सगळे सहन करणारी स्त्री म्हणजे महान होती. तिच्या बद्दल आदर हा विषयच नव्हता. दहा वर्ष म्हणजे काही लग्नाचं वय असत कां. आजकाल मुली सतरा अठरा वर्षाच्या अगदी लग्न व्हायची वेळ आली तरी म्हणतात अजून शिकायचं वय आहे लहान आहे तिला कळतं असं पाहायला मिळत. फक्त मुलगा होण्यासाठी ...

परिस्थितीचं भेसूर तोंड... // रसग्रहण

इमेज
परिस्थितीचं भेसूर तोंड... भाकरीच्या दूल्डीतले कुटके आर्धे उंदरायनं कतरले तं राहेल आर्ध्यावर  लेकरं ध्यान ठेवून हे. चाळणी होयेल दूल्डीतून भाकर झाकणारं उपरणं आर्ध दूल्डीत तं आर्ध भुयीवर टेकू राह्यलं मांजरीनं डोळे लावून प्यावं दूध आशीच गत मही बी झालीय भामट्यावानी.. घरातलं तेल, मिठ, पिट, आटल्यानं बायकूची हाय खचली तीचे खोल जायेल डोळे मला, आटत जाणार्या ईहिरीवानी दिसू राह्यले  घरात मुंगीला मुताचा पूर झालाय लेकरायची भाकर भेटन हे सपनं पाहणारी नादान नजर  टोचू राह्यली काळजाला आरपार.. परिस्थितीचं भुताडावानी हे भेसूर तोंड आझूनच भेसूर होत चाललंय दिवसेंदिवस...  किशोर त्रिंबक भालेराव जालना 9168160528 ==================================     देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्ष उलटून गेली  . संविधान लागू होवून पाऊणशे वर्ष पूर्ण झाली तरीही   देशातील सामान्य जनतेच्या भुकेचा प्रश्न सुटलेला नाही . महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर  अण्णा भाऊ साठे यांच्या स्वप्नातील भारत अजुनही साकरलेला नाही. याचं कारण इथली जातीव्यवस्था,इथले स्वार्थाचे राजकारण...

अन्वयांची अक्षरलिपी - जाणिवेचं गॉड पार्टिकल पकडणारी कविता.

इमेज
अन्वयांची अक्षरलिपी - जाणिवेचं गॉड पार्टिकल पकडणारी कविता छाया बेले, नांदेड खरं तर कविता समीक्षेसाठी नसतेच. कवितेवर प्रेम करावं, कविता अनुभवावी, कविता जगावी. कविता म्हणजे जगण्याची अनुभूती असते. मग ती सुखद असो किंवा दुःखद. घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासानंतरची तृप्ती ही कविताच असते. निसर्गाचे सुंदर रूप बघून जी सुखद जाणीव होते ती कविता असते. एखाद्या दुःखाने आतून तुटणंही कविताच असते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणंही कविताच असते. प्रत्येक वेळी ही कविता शब्दाचे रूप धरून कागदावर उतरेलच असे नाही. अनुभूतीचे अंतिम टोक, जिथे शब्द निःशब्द होतात, ती कविता असते, असं मला वाटतं. ते टोक शब्दांच्या चिमटीत पकडणं शक्य नाही. पण जे चिमटीत सापडेल ते त्या टोकाच्या गॉड पार्टिकल्सने भारित असायला हवं. तेव्हाच ती शब्दांची चिमूट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाणिवेशी एकरूप होऊन भारित करून टाकते. कारण जाणीव ही वैश्विक स्तरावर अद्वैत आहे. प्रत्येकजण जीवनात प्रत्येक अनुभूतीला सामोरे गेलेला असतो. स्थळ, काळ, वेळ जरी वेगळे असले तरी जाणीव एकच असते. ही चिमटीत पकडणारी बोटं केवळ भारवाही असतात. जाणिवेचं हे टोक नेमकेपणाने प...

डॉ. रेषा यांच्या ' पृथ्वीची मुले ' या कवितेचं रसग्रहण

इमेज
*पृथ्वीची मुले...* दिवस रिता नसतोच, मी चाचपडतेय दिशादिशांतून सहिष्णुता‌. भेगाळलेल्या भिंती शाकारण्यासाठीच झाला असतो जन्म माझा. आवडत नाही मला जीवनातील बेपर्वाई... शब्द कारागिरी करतील उद्या तेव्हा सहिष्णुतेची गोष्ट पुढे येईल - रांगत येणारी पृथ्वीची मुले सहिष्णुतेचं बोट धरतील, पेरलं की उगवतंच, अनाठायी असं काहीच नसतं वातावरणात... आपला भोग, योग असतो दिशांचा मग न डगमगता चालत जातो आपण... खरे तर अडकवतोय काळ आपल्याला भ्रमाच्या जाळ्यात, आपलं सच्चेपण ओळखायला. समोर आलेल्या गुंत्याला गुंता म्हणू नये कधी काटे फुलांना सांगतात की आम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी आहोत, घाबरू नका... आता, आयुष्याच्या या उतरणीवर  थोडं ज्ञान झालं की  जीवन बदलणार आहे  जीवनमूल्यांची मांदियाळी  जग उजळून टाकणार आहे.  - रेषा     पुढ्यात येऊन उभं राहिलेलं वर्तमानाचं वास्तव संवेदनशील मनाची घालमेल करणारं  , अस्वस्थ करणारं आहे. माणसाच्या जगात माणूसच गौण ठरत आहे. जात, धर्म, पंथ  एवढे टोकदार झाले आहेत की माणसाचं अस्तित्व कोणीतरी ज्वालामुखीच्या तोंडावर ठेवून द्यावे असं झालेलं आह...

नाती वांझ होताना : उसवत चाललेल्या नात्यांचा रक्ताळलेला दस्तऐवज | पुस्तक परिचय

इमेज
नाती वांझ होताना : उसवत चाललेल्या नात्यांचा रक्ताळलेला दस्तऐवज        नाती वांझ होताना हा सध्या चर्चेत असलेला मनीषा पाटील यांचा कवितासंग्रह हाती येऊन बरेच दिवस झाले. वाचूनही झाला. मात्र दैनंदिन व्यापात अभिप्राय देण्यास उशीर झाला, त्याबद्दल दिलगीर आहे. मनीषा पाटील या वास्तवाचे भान ठेवून जबाबदारीने लेखन करणाऱ्या संवेदनशील कवयित्री आहेत. ठेवणीतल्या कपड्याला कसर लागून ठेवल्या जागी ते कापड फाटावे, तसं उसवत चाललेल्या नात्याचं वास्तव ‘नाती वांझ होताना’ या संग्रहातून मनीषा पाटील यांनी नेमकेपणाने टिपले आहे.  कुटुंबाची धुरा आणि स्त्रीच्या वाट्याला आलेली उपेक्षा नाती वांझ होताना हा कवितासंग्रह उजागर करतो. मानवी समाजातील कुटुंब व्यवस्था ही केवळ महिलांमुळे टिकून आहे. त्यांच्यातील वात्सल्य, ममता या गुणांमुळे त्या कुटुंब व नातेसंबंध जपत जातात. लग्नानंतर माहेर सोडून आलेली स्त्री, त्या घराच्या चालीरीती, रूढी-परंपरा स्वीकारून स्वतःला त्या साच्यात घडवून घेते. ती आपल्या मुलांबरोबरच ते घर, तिथली माणसं यांची काळजी घेते, जपणूक करते. ती मुलांची, नवऱ्याची, सोबतच घराचीही आई ह...

लोककवी श्रीनिवास मस्केच्या कवितेवरील रसग्रहण!!

इमेज
टिचल्या मातीला आभाळ देऊ ……………………… सावल्या उन्हाळल्यात  चल थोडा विसावा घेऊ  खूप कोलाहल आत  टिचल्या मातीला आभाळ देऊ  पोटऱ्यात कणीस भरलं ही नव्हतं नीट शेरडामागं फिरणारे पाय  बांधले खुट्याला  वेलीवरचं फुल गळून पडलं चूल ..शेत.. गोठा ..नदी  आता साथीला… चल थोडं माथ्यावर  दूरून गाव बघू  घर घर घर नुस्ती घरघर आरसा ही बोलत नाही  चेहऱ्यावर घामाची पाहून वल  परकलातल्या दोन वेण्या हरवल्या परक्या घरी सांगल कुणाला सल कोंडलेल्या श्वासाला चल मोकळा वारा देऊ…. ना पोर्णिमेचा चंद्र आला  कसली काय चंद्रमिठी  जागलीला शेतात तो  घरात हिरमुसलेली वटी ताटात भरीत अण् धरलेल्या सटी चल मोकळ्या आभाळाला  एक रात्र देऊ …. दगदगीत जिंदगी आली काठला लेकरांच्या स्वप्नातच जीव गुंतला खळखळणाऱ्या झऱ्याची लय  हिंदडण्या आधीच नदी झाली  चल थोडं ढग होऊन पुन्हा कोसळू  खूप कोलाहल आत  टिचल्या मातीला आभाळ देऊ … @श्रीनिवास सहज सुचलेले..       कविता ही एक सुंदर अभिव्यक्ती आणि गंभीर कृती आहे . कवी विश्वात्मा होवून सृष्टीच्या ...

अन्वयांची अक्षरलीपी | पुस्तक परिचय

इमेज
अन्वयांची अक्षरलिपी - जाणिवेचं गॉड पार्टिकल पकडणारी कविता छाया बेले, नांदेड खरं तर कविता समीक्षेसाठी नसतेच. कवितेवर प्रेम करावं, कविता अनुभवावी, कविता जगावी. कविता म्हणजे जगण्याची अनुभूती असते. मग ती सुखद असो किंवा दुःखद. घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासानंतरची तृप्ती ही कविताच असते. निसर्गाचे सुंदर रूप बघून जी सुखद जाणीव होते ती कविता असते. एखाद्या दुःखाने आतून तुटणंही कविताच असते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणंही कविताच असते. प्रत्येक वेळी ही कविता शब्दाचे रूप धरून कागदावर उतरेलच असे नाही. अनुभूतीचे अंतिम टोक, जिथे शब्द निःशब्द होतात, ती कविता असते, असं मला वाटतं. ते टोक शब्दांच्या चिमटीत पकडणं शक्य नाही. पण जे चिमटीत सापडेल ते त्या टोकाच्या गॉड पार्टिकल्सने भारित असायला हवं. तेव्हाच ती शब्दांची चिमूट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाणिवेशी एकरूप होऊन भारित करून टाकते. कारण जाणीव ही वैश्विक स्तरावर अद्वैत आहे. प्रत्येकजण जीवनात प्रत्येक अनुभूतीला सामोरे गेलेला असतो. स्थळ, काळ, वेळ जरी वेगळे असले तरी जाणीव एकच असते. ही चिमटीत पकडणारी बोटं केवळ भारवाही असतात. जाणिवेचं हे टोक नेमकेपणाने प...