पोस्ट्स

poetry लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आत्मनिष्ठ हुंकाराचा वैश्विक अविष्कार:माधव कौशिक यांची निवडक कविता !!

इमेज
आत्मनिष्ठ हुंकाराचा वैश्विक अविष्कार:माधव कौशिक यांची निवडक कविता छाया बेले नांदेड सर्वभाषा पब्लिकेशन नवी दिल्ली यांनी माधव कौशिक यांची निवडक कविता(२०२५) हे बाळासाहेब लबडे यांनी हिंदीतुन मराठीत अनुवादित केलेले पुस्तक आहे. याची अर्पण पत्रिका मला मनापासून आवडली. कविता असो किंवा कोणत्याही प्रकारचे लिखाण असो , माणसाच्या जगण्याला आधार देणारी , सगळ्यात आधी मानवाला केंद्रस्थानी ठेवणारी साहित्यकृती ही एक स्वयंप्रकाशी नीती असते. धर्म, जात, पंथ, लिंग किंवा कोणत्याही प्रकारचे शोषणाच्या बुडाला आग लावणारे साहित्य हेच खरे साहित्य असते.याच कुळातील ' माधव कौशिक यांची निवडक कविता ' हा डॉ. बाळासाहेब लबडे यांनी अनुवादित केलेला कविता संग्रह नुकताच वाचनात आला. याची हिंदी आवृत्तीही वाचली .  मराठी वाचकांसाठी देश विदेशातील साहित्याचे दालन खुले करून देण्याचा अनुवाद हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे .  डॉ. बाळासाहेब लबडे यांनी हे काम अगदी तंतोतंत पार पडले आहे .  कवितेचा आशय नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोहोचलेला आहे.  या कविता संग्रहातील पहिल्याच कवितेत समकालीन भवतालचा नेमका वेध घेतला आहे. "...

बहुपदरी स्त्री शोषणाची कविता: ' हॅपी होमच्या भिंतीआड' | पुस्तक परिचय - डॉ.मारोती कसाब

इमेज
     बहुपदरी स्त्री शोषणाची कविता: ' हॅपी होमच्या भिंतीआड' -----------------------------------------------                     - डॉ. मारोती कसाब        संशोधन मार्गदर्शक व सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर जि. लातूर  पिनकोड -४१३५१७ मो. ९८२२६१६८५३ प्रस्तावना :                भारतात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला इ.स.१९९० च्या दशकात प्रारंभ झाला. जागतिक आर्थिक महामंदी, माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट, नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास आणि वाढते औद्योगीकरण या पार्श्वभूमीवर जगात सर्वत्र जागतिकीकरणाचे वातावरण निर्माण झाले. जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या अमेरिकेसारख्या भांडवलदार देशाचे सत्ताकारण हेही त्यात भर टाकणारे होते. एकंदरीत मूल्यात्मक पडझडीच्या या काळात भारतासारख्या विकसनशील देशाने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट व्हावे किंवा नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. कारण जागतिकीकरण ही केवळ एक सुटी संकल्पना नव्हती; तर ...

Criminal women

इमेज
Criminal women  Including me, Past and future Generations  With haircut  Or without  Wearing border saree Or without border With pallu or without Those who live in Or go for work  Those who speak Who think Or declared ignorant  Or who remain silent Who think or Not allowed to think  Ignorant  Crying rivers  Or dry within Loving  Not loving Loved And hated  Claim rights Those who surrender  Everything  Those having Husbands Or widows  Having babies  Or barren  Breathing  Dying, suicidal  In the house of laws Or outcaste  Whenever they are All women are criminals  Because they give birth  To men @chhaya bele Translated by @pro.Dr.dhananjay deolalkar

तुझ्या साठीही असतो एखादा दिवस ? | मराठी कविता

इमेज
तुझ्यासाठी असतो एखादा  दिवस माहितही नव्हतं तेव्हा मात्र तूच फिरत रहायचीस  श्वसाच्या सांदिकोपऱ्यातून तुझा चेहरा पाहून उघडायचं हा हट्ट असायचा डोळ्यांचा तू यायचीस समोर कधी गवताचा भारा कधी लाकडाची मोळी कधी पाण्याची घागर डोक्यावर घेऊन अन् उगवायचा माझा दिवस येता जाता जवळ नाही घेतलंस कधी मात्र शाळेत जाताना घातलेल्या वेण्या जवळ ओढून पदरानं रगडून तोंड पुसणं नको म्हणताना दप्तरात कोंबलेली भाकर क्वचित कपाळावर टेकवलेले ओठ या आठवणींना जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून कितीही दूर सारलं तरी तेवढ्याच निग्रहाने गडद होत राहतात  काळजातून काही वेगळं करणं तसंही नसतंच सोपं तुझ्या शिवाय जगायचं असतं एकटीने तगायचं  असतं हे नव्हतंच माहित तेव्हा अंधार पसरू लागताच कड्याच्या टोकावरून दिलेली हाक ऐकून  तू यायचीस वर हातात खुरपे चेहऱ्यावर हसू घेऊन माझी हाक ऐकून  येशील नेहमीच समोर  हेच अमर सत्य वाटायचं तेव्हा तू  हात सोडवून विसावलीस सरणावर मी मात्र जळत आहे अजुनही गरगरतेय काळाच्या भोवऱ्यात मी नाही म्हणत, तू माझं जग होतीस बाहेरचं जग तर होतं तसंच आहे पण आतलंच काही तरी लयाला गेलंय...

कविता - अपरिचित वास्तू

इमेज
अपरिचित वास्तू  शहराच्या घनघोर गर्दीपासून काहीशा अंतरावर उभ्या असलेल्या त्या अपरिचित वास्तुविषयी बोलत असतात लोक काहीबाही त्यांनी न पाहिलेले तिथले दिवस , तिथल्या रात्री तिथले प्रहर, तिथले क्षण या विषयी बांधत असतात नुसतेच अंदाज अन रचतात अख्यायिका आपल्या मेंदूतील किडे सोडत जातात त्या वास्तूच्या अस्तित्वावर.. ती मात्र उभी असते निश्चल निष्पर्ण वृक्षासारखी आपली सुख दुःख आपले सनातन भोग आपल्यातच सामावून घेत अंगणातल्या पिंपळवृक्षावरील कावळ्यांची काव काव मात्र येत असते  अधूनमधून तिच्याही कानावर.. @ छाया बेले.

उत्क्रांत | कविता

इमेज
कोणतंही नातं  जोडून जवळ आला  तरीही त्याची धाव  फक्त तिच्या देहापर्यंत  असते तिच्या  आत्म्यापर्यंत जावून अंतरात्म्यात विरघळून जावा एवढा उत्क्रांत  नाहीच झाला तो अजून ©®छाया बेले