पोस्ट्स

मराठी लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युवक : सत्याग्रह, संघर्ष व देशाचे भविष्य

इमेज
युवक : कॉकरोज सत्याग्रह, संघर्ष व देशाचे भविष्य युवक: कॉकरोच सत्याग्रह, संघर्ष व देशाचे भविष्य  यह देश वीर कॉकरोचों का, अलबेलों का मस्तानों का...!! जंतर-मंतरवरील त्या लेकरांकडे पाहून या ओळी मनात घोळत आहेत. मागील अनेक दिवस चाललेल्या युवकांच्या आंदोलनाने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली - या देशाची खरी शक्ती त्याचा युवक आहे. देशाची ओळख त्याच्या नैसर्गिक संपत्तीने किंवा आर्थिक प्रगतीने ठरत नाही, तर तिथल्या युवकांच्या विचारांनी ठरते. प्रत्येक पिढी इतिहास वारशाने घेते, पण भविष्य स्वतःच्या कृतीतून घडवते. युवक म्हणजे केवळ वयोगट नाही, तो परिवर्तनाची आस आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा अन्यायाला नकार दिला गेला, तेव्हा तो नकार युवकांचाच होता. फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता दिली. अलीकडे नेपाळमधील युवकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. भारतीय इतिहासही याचाच साक्षीदार आहे - राजवैभवाचा त्याग करणारे सिद्धार्थ गौतम, जातिभेदाविरुद्ध लढणारे महात्मा बसवेश्वर, शिक्षणाला मुक्तीचे शस्त्र बनवणारे ज्योतीराव फुले, आणि ज्ञान, संघर्ष, संघटनेच्या बळावर व्यवस्थेला आव्हान देणारे डॉ. आंबेडकर. ...

बाईपणाच्या बंदिस्त कवाडांना मोकळं करण्याचं पसायदान मागणारी छाया बेले यांची कविता - - - -कवी श्रीनिवास मस्के

इमेज
बाईपणाच्या बंदिस्त कवाडांना मोकळं करण्याचं पसायदान मागणारी छाया बेले यांची कविता -कवी श्रीनिवास मस्के  ******************************        हरवत चाललेला माणसाचा हृदयसंवाद  .हाती शून्य घेऊन नाकात वारं शिरलेल्या गोऱ्यागत उर्फुटोस्तोर धावणारी माणसं . चेहऱ्यावरचे कारूण्य अबाधित  ठेवत चेहऱ्याच्या, बिनचेहऱ्याच्या काबाडकष्ट करत जगणाऱ्या बायका रूढीपरंपरेच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी फडफडणाऱ्या  द्रौपदीचे वस्त्र , सीतेचं जळणं इतिहासाला कोरत अस्वस्थपणे पाहत असलेल्या . करपत जाणारं बालपण सावरून घेत तारूण्याचा विस्तव जपत दहाघरचं काम करून शिणून घरी जाणाऱ्या बाईचा नवरा हातात चहाचा कप देतो तेव्हा तिला येणारं बळ आणि पांढरपेशी जगण्याचा बडेजाव करणाऱ्या बायकांचं बेगडी वैभव शुन्य ठरतं, गळून पडलेला श्रींमंतीचा रौप दोन संस्कृतीतील बाईच्या जगण्यातलं अंतर किती सहज सुक्ष्म टिपलेलं दिसतं. .        छाया बेले यांची कविता  बाई ही आई,पत्नी ,नर्स, सेविका रूपात दिसते . ती 'माणूस' या रूपात का सापडत नाही ही सल व्यक्त करतांना दिसते . तशी ती धर...

महिलांच्या अर्ध्या जगासाठी दासप्रथा अजुनही जिवंत आहे — प्रगतीच्या आडोशातील कटू सत्य (भाग १)

इमेज
अजूनही प्रगतीच्या आडोशाला लपलेली कुरूपता म्हणजे महिलांच्या आयुष्यातील न दिसणारी दासप्रथा.     माझ्या लिखाणाचा उद्देश एवढाच आहे की, मानवी समाजात स्त्री- पुरुष भेद नष्ट व्हावा. दोघांतील दरी कमी व्हावी. स्वातंत्र्य ,न्याय, समता, मानवता दोघांसाठीही आहे याची जाणीव निर्माण व्हावी.  पुर्वीच्या काळात सर्वांसाठी दासप्रथा अस्तित्वात होती. आजच्या काळात ती नाही असं नाही. ती आता केवळ स्त्रीच्या जीवनाशी मर्यादित झाली आहे. ती स्त्रियांना दिलेल्या वागणुकीतून, त्यांच्यासाठी असलेल्या नियमातून उघड उघड दिसून येते. त्यासाठी  संबोधनं  तेवढी वेगळी वापरली जातात. लेक असताना वेगळे लोकसंख्या, पत्नी झाल्यावर वेगळ्या, वेगवेगळ्या भुमिका वेगवेगळे तुरूंग असं स्त्रीच जीवन आहे. या लेखात आपण याचा विविध अंगांनी विचार करणार आहोत.        मानवजातीचा इतिहास हा सतत विकसित होत जाण्याचा, स्वतःला नव्याने घडवण्याचा इतिहास आहे. विज्ञानाच्या शोधांनी निसर्गातील अनेक गूढ उलगडली, तंत्रज्ञानाने वेळ आणि अंतर यांच्यातील मर्यादा कमी केल्या, शिक्षणाने विचारांना व्यापकता दिली, आणि अर्थ...

ऑनलाइन जवळ, मनाने दूर – सोशल मीडियाचं वास्तव

इमेज
सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये वाढलेलं अंतर - आत्मचिंतन मानवी नातेसंबंध हे केवळ रक्ताच्या किंवा सामाजिक बंधनांवर आधारित नसतात, तर ते संवाद, विश्वास, समज आणि भावनिक गुंतवणूक यावर आधारलेले असतात. हे गुण असतील तरच नाती दृढ व अतूट होतात. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात साधनं नव्हती. आपला सीमित भोवताल हेच आपलं जग होतं. तेव्हा नात्यांमध्ये मायेची उब, जिव्हाळा, परस्परांच्या सुखदुःखाची जाण होती. सहा महिने किंवा वर्षाला आलेलं एखादं पत्र या हृदयातील भाव त्या हृदयापर्यंत पोहोचवत असे. तेव्हा माणसात आपुलकीची ओढ होती. अधूनमधून प्रत्यक्ष भेटीत एकत्र बसून मनसोक्त गप्पा व्हायच्या. यामुळे नात्यांची वीण अधिक घट्ट होत असे. माणसाची जागा माणसासाठीच राखीव होती. मात्र एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलून टाकला. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या माध्यमांनी जगाला “ग्लोबल व्हिलेज” बनवलं. अभासी माध्यमांनी जगभरातील माणसं जोडली गेली. माणसा-माणसांतील अंतर कमी केलं. संवाद सुलभ केला. “माणसं जोडली गेली असली तरी, ...

प्रस्थापित पुरुष आणि विस्थापित स्त्री — एक विधी आणि बंद वाटा

इमेज
प्रस्थापित पुरुष आणि विस्थापित स्त्री — एक विधी आणि बंद वाटा !! “ स्थैर्य त्याला, विस्थापन तिला”  'प्रस्थापित पुरुष आणि विस्थापित स्त्री' हा विषय केवळ स्त्री-पुरुषांतील मतभेदांचा किंवा केवळ कौटुंबिक तणावाचा मुद्दा नाही, तो सामाजिक , ऐतिहासिक, सांस्कृतिक,राजकीय अशा सर्व स्तरावरील दिर्घ कालीन संघर्ष आहे.       समाजरचनेत पुरुषाला, ‘सत्ताधारी’ यजमानपद मिळाले, तर स्त्रीला दुय्यम दर्जा, व विस्थापन वाट्याला आले. मुद्दामच अशी समाज रचना केली गेली. तिचे ‘परावलंबित्व' मजबूत केले. लहानपणापासून तसे धडे दिले गेले.    तिच्या मनावर सेवा, त्याग अशा गुणांचे संस्कार करून, तिला अप्रत्यक्षपणे सेवक म्हणून घडविले जाते. या प्रक्रियेत पुरुषाचे स्थान अधिकाधिक दृढ होत गेले व स्त्रीचे स्थान सतत बदलणारे, अनिश्चित, असुरक्षित राहिले.  “ स्थापित” आणि “विस्थापित” हे शब्द केवळ भौतिक स्थिती दाखवत नाहीत; ते मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभवांचे प्रतीक आहेत.     समाजशास्त्रज्ञ शरद पाटील यांनी   'रामायण महाभारत वर्ण संघर्ष'  या ग्र...

वसुंधरा दिन - आत्मपरीक्षणाची गरज !!

इमेज
वसुंधरा दिन - आत्मपरीक्षणाची गरज !! वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ॥१॥  येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ॥धृ॥  तुकोबांचा हा अभंग ऐकताना मन निसर्गात हरवून जाते. निसर्गाची सोबत किती शुध्द, निर्मळ आहे याचीही जाणीव तुकोबा करून देतात.  मात्र आजची निसर्गाची अवस्था पाहून अस्वस्थ व्हायला होते . माणूस स्वतःला सर्व प्रण्यात हुशार समजतो, मात्र तो खरंच तसा आहे का? आपल्याच विरोधात काम करणाऱ्याला कोण हुशार म्हणेल ? आज जे निसर्गात असंतुलन निर्माण झालं आहे त्याला फक्त माणूसच जबाबदार आहे. वरचेवर वाढत चाललेलं तापमान, हवा प्रदुषण, नद्यांचं प्रदुषण, जिकडं पाहावं तिकडं प्लास्टिकचे, कचऱ्याचे ढीगच ढीग, माणसानं अगदी आकाशातही कचरा करून ठेवला आहे. हे खरंच शहाणपण आहे का? याचा विचार व्हायला हवा.  माणसाने जे जे काही निर्माण केलंय त्याशिवाय माणूस जगू शकतो. मात्र निसर्गाने  आपल्याला मिळणारी एखादी गोष्ट द्यायची बंद केली किंवा ती आपल्याच चुकीने नष्ट झाली तर माणूस जगू शकतो का? जसं की हवा, पाणी, अन्न इत्यादी. हे माणसाला कधी कळणार आहे?   ...

वृत्ती -प्रवृत्ती / कुणासमोर आपलं मन मोकळं करण्याआधी जरूर वाचा.

इमेज
वृत्ती - प्रवृत्ती           दिल खोल दोगे  यारों के सामने तो  नहीं खोलना पडेगा औजारो के सामने        यासारखे अनेक मेसेज दररोज सकाळी सकाळी आपल्या फोनवर  येत असतात. त्यात  माणसाला माणसाशी जोडण्याचा विचार असतो. माणूस एकटा पडत चालला आहे, मित्रपरिवार नातेवाईक यांच्याशी जवळीक निर्माण व्हायला हवी असा आशय असतो . आतले कोवळे मन हे विचार वाचून भावविभोर होते.  एखाद्या अस्वस्थ क्षणी ते विचार आठवतात आणि आपण आपल्या जवळच्या वाटणाऱ्या  व्यक्तीजवळ जी आपल्या नजरेत थोडीफार जबाबदारही असते आपलं मन मोकळं करतो .     मनाचा निचरा झाल्याने काही वेळासाठी हलकंही वाटतं.   मात्र ज्या व्यक्तीला आपण आपल्या खाजगी जीवनातील सुखदुःख सांगितलेले असते ते ती व्यक्ती त्याच्याच जवळ न ठेवता सगळीकडे सांगत सुटली तर मात्र मनस्ताप अजून जास्त वाढतो .  हे झालं कुणासमोर आपलं मन मोकळं करणाऱ्याच्या भावनांचा आपल्या गॉसिपसाठी मसाला म्हणून वापर करणाऱ्यासंबंधित .      दुसरा प्रकार असाही असतो की , एखाद्याच्या...

अन्वयांची अक्षरलीपी | पुस्तक परिचय

इमेज
अन्वयांची अक्षरलिपी - जाणिवेचं गॉड पार्टिकल पकडणारी कविता छाया बेले, नांदेड खरं तर कविता समीक्षेसाठी नसतेच. कवितेवर प्रेम करावं, कविता अनुभवावी, कविता जगावी. कविता म्हणजे जगण्याची अनुभूती असते. मग ती सुखद असो किंवा दुःखद. घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासानंतरची तृप्ती ही कविताच असते. निसर्गाचे सुंदर रूप बघून जी सुखद जाणीव होते ती कविता असते. एखाद्या दुःखाने आतून तुटणंही कविताच असते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणंही कविताच असते. प्रत्येक वेळी ही कविता शब्दाचे रूप धरून कागदावर उतरेलच असे नाही. अनुभूतीचे अंतिम टोक, जिथे शब्द निःशब्द होतात, ती कविता असते, असं मला वाटतं. ते टोक शब्दांच्या चिमटीत पकडणं शक्य नाही. पण जे चिमटीत सापडेल ते त्या टोकाच्या गॉड पार्टिकल्सने भारित असायला हवं. तेव्हाच ती शब्दांची चिमूट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाणिवेशी एकरूप होऊन भारित करून टाकते. कारण जाणीव ही वैश्विक स्तरावर अद्वैत आहे. प्रत्येकजण जीवनात प्रत्येक अनुभूतीला सामोरे गेलेला असतो. स्थळ, काळ, वेळ जरी वेगळे असले तरी जाणीव एकच असते. ही चिमटीत पकडणारी बोटं केवळ भारवाही असतात. जाणिवेचं हे टोक नेमकेपणाने प...

माय सावित्रीचे ऋण स्त्रियांनी विसरता कामा नये

इमेज
         माय सावित्रीचे ऋण स्त्रियांनी विसरता कामा नये      गौतम बुद्धापासून तर आतापर्यंत अनेक महामानवांनी , संतांनी भारतीय मानवसमाजातील शोषण व्यवस्थेचा निषेध करून, शोषणाविरुद्ध लढा दिला .      क्रांतीबा आणि माय सावित्री या दांपत्याने स्त्री शिक्षणाची केलेली क्रांती आजच्या आधुनिक काळातील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे .   माय सावित्रीने, मुलींच्या हातातील लाटणं काढून लेखणी देण्याचं महान कार्य  केले आहे.           गुलामीच्या बेड्या ठोकून कैद केलेल्या गेलेल्या मानवजातीच्या  अर्ध्या समुहाला  अंधार कोठडीतून बाहेर काढण्यासाठी  क्रातिंबा आणि माय सावित्रीने उभी हयात  खर्ची घातली.      १८४८ हे भारतीय समाजात क्रांती घडवून आणणारे क्रांतीकारी वर्ष म्हणावे लागेल. याच वर्षी  महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलिंची पहिली शाळा सुरू केली.     सावित्री बाई फुले या भारत...

जगा स्वतःसाठी | निसर्ग आणि माणूस परस्परावलंबी जीवनाचा विचार - छाया बेले

इमेज
// जगा स्वतःसाठी // निसर्गाने माणसाला अफाट अशी बौद्धिक ताकद बहाल केली आहे. गुहेपासून आजच्या आधुनिक युगापर्यंतचा प्रवास या बौद्धिक ताकदीमुळेच शक्य झाला आहे. माणसाने जर ठरवले तर कुठलीही गोष्ट सहज साध्य करू शकतो. विवेक जागृत ठेवून कार्य केले तर आपल्या व इतरांच्या जीवनाचे नंदनवन करू शकतो. नाही तर क्षणात सृष्टीचाही विध्वंस घडवून आणू शकतो. चांगल्या किंवा वाईटाची निवडही तो करू शकतो. काय निवडायचे हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ही फार मोठी जबाबदारी माणसावर आहे. आजकाल "जगा स्वतःसाठी" या विचाराने सगळीकडे अगदी धुमाकूळ घातला आहे. आणि प्रत्येकजण या शब्दाचा अर्थ आपल्याला हवा तसा लावून स्वार्थामागे धावत सुटला आहे. माणसाने जगणे या संकल्पनेचा किती संकोच करून ठेवला आहे. कुठून आली ही मानसिकता? निसर्गाने निर्माण केलेल्या या जीवसृष्टीत स्वतःसाठी जगणे म्हणजे जगणे असू शकते का? याचा आपण थोडा जरी गांभीर्याने, विवेकबुद्धीने विचार केला तर "जगणे" या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे हे आपल्या लक्षात येते. जीवसृष्टी ही परस्परावलंबी व परस्परपूरक आहे. एका जीवाचे दुसऱ्या ...