पोस्ट्स

समीक्षा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्त्री सक्षमीकरणाची हमी देणारी छाया बेले यांची कविता - डॉ. मारोती कसाब| पुस्तक परिचय

इमेज
स्त्री सक्षमीकरणाची हमी देणारी छाया बेले यांची कविता - डॉ. मारोती कसाब | पुस्तक परिचय  ----------------------------------------------------------             सध्या मराठी साहित्यात कवितेचे पीक अमाप आणि उदंड झाले असले तरी त्यामध्ये स्त्रियांच्या कविता फार तुरळक प्रमाणात आढळतात. हजारो वर्षांपासून स्त्रियांवर अनेक बंधने येथील पारंपरिक समाजव्यवस्थेने लादलेली आहेत. वाचा असूनही तिला बोलू दिले नाही. इच्छा असूनही अभिव्यक्त होऊ दिले नाही. एकंदरीत सर्वत्र क्षेत्रात ती पुरुषाच्या मागे कशी राहील हेच या व्यवस्थेचे धोरण होते. त्यामुळे आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मराठी सारख्या लोकभाषेत लिहिणार्‍या स्त्रियांची संख्या कमीच आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या आणि सक्षमपणे लिहिणाऱ्या स्त्रियांची या व्यवस्थेकडून आवश्यक ती दखल घेतली जात नाही. तरीही काही स्त्री लेखिका अनेक अडथळ्यांवर मात करून लिहीत आहेत. त्या चिवटपणे साहित्य क्षेत्रामध्ये येण्यासाठी लढताहेत धडपडत आहेत. आशा स्त्री लेखिकांना समाजात मानापानाचे स्थान मिळत नाही. तर उलट त्यांची उपेक्षाच क...

दत्तू मास्तर : काटेरी बेट झालेल्या जगात माणुसकी रुजवणारी कादंबरी |पुस्तक परिचय

इमेज
दत्तू मास्तर : काटेरी बेट झालेल्या जगात माणुसकी रुजवणारी कादंबरी |पुस्तक परिचय                      हल्ली माणसाच्या आत्मकेंद्रीपणने कळस गाठला आहे. मी आणि माझं याशिवाय माणसाला काही दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक माणूस हा काटेरी बेट होत चालला आहे. या आत्मकेंद्री पणामुळे मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.  या कारणाने समाजात पराकोटीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे जरी आजच्या समाजाचं वास्तव असलं तरी काही माणसं स्वार्थ बाजूला ठेवून संताचे, महामानवांचे मानवकल्याणाचे विचार कुठलाही गाजावाजा न करता आपल्या कृतीतून जगत असतात व समाजात रूजवत असतात. आपल्या आजूबाजूचे जग सुंदर समृद्ध करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. मानवते प्रति अपार करूणा असलेल्या मास्तरची कहाणी योगीराज वाघमारे यांच्या "दत्तू मास्तर" या कादंबरीचा विषय आहे. यशोदीप प्रकाशना कडून अलिकडेच प्रकाशित झालेली योगिराज वाघमारे यांची ही कादंबरी महत्त्वाची जीवनमूल्य घेऊन वाचकासमोर आली आहे.  योगिराज वाघमारे साहित्यविश्वातील मानदंड आहेत अस मत पाठराखण करताना प्रकाशिका प्राध्य...

धगीतून चालते ती // अभिप्राय!!

इमेज
      स्त्री ही साहित्य, कला यांच्या कायम केंद्रस्थानी राहिलेली आहे. अगदी अनेक महाकाव्य सुद्धा स्त्री या वर्तुळाभोवतीच रचली गेली आहेत . मात्र तिला कोणत्या स्वरूपात मांडले गेले हा मुख्य मुद्दा आहे.     कळलावी, घरफोडी, कुरघोडी करणारी, कुलटा, शिकलेली असेल तर ती स्वैर वागणारी , कुठल्याही जबाबऱ्या न स्विकारणारी अशाच प्रतिमा व प्रतिकातून स्त्री साहित्यातून भेटत आली आहे.      मात्र तिला खऱ्या रूपात समोर आणणे, तिचा संघर्ष, जिद्द, जिवनजाणीवा, जगण्यावरील तिची निष्ठा , तिचा स्वाभिमान , जिवनाला भिडण्याची उर्मी , तिच्याठायी असलेलं सत्व साहित्याच्यातून मांडणे इथल्या पुरुष सत्ताक मानसिकतेच्या साहित्यिकांना कधीच जमलं नाही.      मात्र  साहित्य सम्राट,  अण्णाभाऊ साठे यांनी  स्त्रियांना सन्मान देत  तिला तिच्या खऱ्या स्वरूपात मांडले.   नायिकांना नायका एवढ़च महत्त्व , तेवढंच महत्त्वाचं स्थान, मान त्यांनी आपल्या साहित्यातून दिला. अण्णाभाऊनी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टिकोन ठेवून लिखाण ...

रचनाच्या कवितेचे रसग्रहण !!

इमेज
रचना यांच्या कवितेचे रसग्रहण !! सकाळी सकाळी गुलाबजलची बाटली साफ करण्यासाठी सवयीनं लिक्विड सोप ओतलं प्रत्येक बाटली साफ करताना वापरतात तसं अन काळजात चर्रर्र झालं ... गुलाबाच्या मंद सुगंध  मिटविण्यासाठी रसायनाचा वापर अगदी खूप सारं प्रेमाच चॅट  डिलीट फॉर एव्हरीवन किंवा क्लिअर चॅट  केल्यासारखं गुलाबाचा सुगंध संपूर्णतः मिटवण्याचा प्रयत्न ... इतके कृतघ्न आपण स्वतःचा आत्मा  डिजीटल करून घेताना नैसर्गिक गुलाबी सुगंध कायमचा निकालात काढत सेंद्रियत्व हरवून आम्ही होतोय रासायनिक  मुळासकट साफ करत व्हाईट कॉलर क्लिअर  अन डिजिटल एका क्लिकवर  माणसा सकट सारंच डिलीट करत भावनाशून्य होत ... करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर की होतोय  दिवसेंदिवस मनोरूग्ण ... 🖍️ रचना दि. १६ / ७ / २०२४         सध्याचा काळ हा एवढ्या वेगाने धावतोय की बघून उर दडपून जातो . या पंचवीस वर्षांत म्हणजे मोबाईल फोन आल्यानंतर त्याचे  मानवी जीवनावर झालेले परिणाम कवयित्री रचनाने अगदी अचूकपणे टिपले आहेत . आपण मुकाटपणे सोसत  असलेलं दुखणं कोणीतरी लक्षात आणून देतं ते...

उजेडाची नाव : आस्वाद

इमेज
             उजेडाची नाव : आस्वाद         मानवी जीवनात व्यक्त होणे ही एक महत्त्वाची गरज आहे. अनादी काळापासून अनेक प्रकारे तो व्यक्त होत आहे. व्यक्त होण्यासाठी मानवाने अनेक कला विकसित केल्या. संगीत, नृत्य, चित्रकला, साहित्य . लेणी , गुहा - चित्रे हेही मानवाच्या व्यक्त                होण्याच्या गरजेची निर्मिती आहे . अगदी वाळूत , मातीत रेघोट्या मारून माणूस आपल्या भाव -भावना व्यक्त करतो.   सध्याच्या काळात तर व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर केला जातो.  पैकी एक म्हणजे कविता होय .      कविता म्हणजे जीवन-जाणीवांना फुटलेला झरा होय . आत खोलवर रुतलेलं काही आपसूक शब्दरूप घेऊन बाहेर येतं आणि मग त्याची कविता होते.              तसं बघितलं तर मानवात इच्छा असुनही प्रत्येकाला व्यक्त होता येतंच  असं नाही. प्रतिभा असली तरी व्यक्त होण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध होतेच असेही नाही. भारतीय समाजात वर्ण व्यवस्थेने अनेक स...

आस्वाद: घामाची ओल धरून ( कविता संग्रह)

इमेज
आस्वाद : घामाची ओल धरून ( कवितासंग्रह)        आबासाहेब पाटील यांचा     ' साध्या माणसाच्या कविता ' हा संग्रह वाचला आणि  कविता मनात घर करून गेली . सोशल मिडियावर हल्ली कवितेचा धो धो पाऊस पडतोय . त्यात " कविता "   खूप कमी सापडतात . या पसाऱ्यात काहीच कविता आपलं अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करतात .     चंद्र ,  सुर्य ,  पाऊस ,  नदी , समुद्र यांना स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही . तसंच कवितेलाही तिची ओळख करून देण्याची गरज नसते . कवितेला ही कविता आहे असं सांगावं लागत असेल तर ती कविता असेलच असे नाही .      आबासाहेबांची  कविता हिमनगासारखी आहे. तिची खोली आणि उंची सारखीच . जीवनाच्या गल्लीबोळातून वाहात थेट तळ गाठते . वर येऊन पर्वत होते .  आबासाहेब पाटील यांचा "  घामाची ओल धरून "  हा  कविता संग्रह  नुकताच हाती आला  आणि पुन्हा पुन्हा वाचून काढला . आबासाहेबांची कविता प्रत्येकवेळी नवी भासते . नव्याने उलगडत जाते . तर कधी आपल्या  अलवारपण...

साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व | पुस्तक परिचय

इमेज
साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे - कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व : अभिप्राय साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व हा ग्रंथ हाती येऊन बरेच दिवस झाले. ग्रंथ वाचून झाला तरी या श्रेष्ठ कलाकृतीवर कसं आणि काय लिहावं याच विवंचनेत होते. लिहिल्याशिवाय राहवलंही नाही. थोडक्यात जमेल तसा मी माझा अभिप्राय नोंदवला आहे. हा ग्रंथ वाचणंच एक पर्वणी आहे. उत्खनन करून भूईच्या गर्भातून अनभिज्ञ असलेल्या गोष्टी बाहेर काढाव्यात तसं सुरेश पाटोळे यांनी अण्णा भाऊंचे प्रकाशित व अप्रकाशित साहित्य, जीवन याचे उत्खनन करून अमूल्य असा ठेवा वाचका हाती दिला आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या महामानवावर लिहिणं किंवा बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणती धरावी असं आहे. अण्णा भाऊंची प्रतिभा त्यांचं कर्तृत्व जगमान्य आहे. अण्णा भाऊंना वाचून त्यातील आपल्या कुवतीनुसार काय घेता येईल ते प्रत्येकाने घ्यायला हवे. आणि प्रत्येकासाठी त्यात खूप काही घेण्यासारखं आहे. अण्णा भाऊंना वाचत असताना किंवा कोणत्याही साहित्यिकाला वाचत असताना वाचकाचा दृष्टिकोन जसा आहे त्या अनुषंगाने अर्थ लावण्याची शक्यता असते. कोणा एका चष्म्यातून कलाकृ...

मनिषा पाटील यांच्या कवितेवरील रसग्रहण

इमेज
***************************** बायका टाळतात बायकांना  ***************************** बायका टाळतात बायकांना  त्या उपाशी राहतात संवादाशिवाय..... कित्येक दिवस  कित्येक महिने . तुरटी फिरवून गप्पकन बसवता येत नाही त्यांना  मनाच्या कोपऱ्यांना चिकटलेली असुयेची राळ. त्यांना लागत नाही कारण बिरण कित्येकदा विनाकारणही त्या टाळत राहतात  ऐकमेकींना... समारंभाच्या झगमगाटात..कधी बाजाराच्या गर्दीत  कधी भगभगीत रस्त्यावर  तर कधी फेसबुक,व्हाॕट्सअॕपवर. बायकांना नकोसा वाटतो ऐकमेकींचा नेञकटाक्ष... अगोदरच ठाण मांडून बसलेल्या जावेसारखी बाई असह्य होते बाईलाच. वरचढपणाच्या तालेवार कटारी घुसत राहतात काळजात... बायका कुजबुजतात त्यांना सोसत नाहीत  मैञिणीच्या फोटोचे शेकडो लाईक्स,.,, कुबट अंड्यासारख्या त्या  घुमत राहतात दुर्गंधीने बायका टाळतात बायकांना . बायकांना नको नको वाटतात बायका  त्यांच्यासमोर मिरवणा-या... त्यांच्या ताणलेल्या त्वचेत दिसत नाही  मोनालिसाचे स्मित... बायका फुलत नाहीत  कोणत्याच बहरात मोकळेपणाने. त्या खुरट्या झाल्यात बोराटीसारख्या... बाय...

किराळ : ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन | पुस्तक परिचय

इमेज
        किराळ - मातीत रुजलेला अस्सल ग्रामीण जीवनानुभव  ग्रामीण जीवनाचे अस्सल चित्रण करणारा शेती मातीतील माणसाचं जीवन दर्शन घडवणारा प्राध्यापक यशवंत माळी यांचा साहित्याक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलेला किराळ हा कथासंग्रह शेती मातीतील माणसाचा जगणं, त्यांचा संघर्ष लेखकाने या कथासंग्रहातून मांडला आहे. अस्सल जीवनानुभव, अस्सल ग्रामीण भाषा यामुळे किराळ हा कथासंग्रह वेगळा ठसा उमटवून जातो. जागतिकीकरणामुळे ग्रामीण संस्कृती एकूणच ग्रामीण पर्यावरण प्रभावित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण साहित्यावरही याचा परिणाम होऊन अस्सलता हरवल्यासारखी वाटते. खेड्यातील मुले शिकली नोकरी-व्यवसायानिमित्त शहराकडे स्थलांतरित झाली. ती लिहिती झाली. आपला जगणं आपला संघर्ष साहित्याच्या माध्यमातून चित्रित करत असली तरीही त्यात शहरी आणि ग्रामीण अशी सरमिसळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर आलेला यशवंत माळी यांचा किराळ हा कथासंग्रह अस्सल ग्रामीणत्व घेऊन आलेला असल्यामुळे या कथासंग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त होते. किराळ कथासंग्रहाच्या पहिल्याच कथेतून लेखकाच्या भाषेवरील प्रभ...

शंकर भाऊ साठे: व्यक्तीत्व व कर्तृत्व: पुस्तक परिचय !!

इमेज
    दलित साहित्यिकांच्या वाट्याला कायम उपेक्षाच आलेली आहे. प्रस्थापीथ साहित्याने त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सारखे जगप्रसिद्ध साहित्यिक सुद्धा यातून सुटले नाहीत.शंकर भाऊ साठे सारख्या अशाच एका महत्त्वाच्या तरीही उपेक्षित राहिलेल्या साहित्यिकांवर पीएचडी करून डॉक्टर मारुती कसाब यांनी अतिशय मोलाचे कार्य केलेले आहे. 344 पानाच्या या ग्रंथातून अतिशय सखोल असं संशोधन करून शंकरभाऊंच्या साहित्यिक कारकिर्दीसह त्यांच्या जीवनाचा ही विस्तृत आढावा घेतला आहे. एवढंच नाही तर मातंग समाजाच्या साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून चा इतिहास या ग्रंथात नोंदवला आहे.    मांग ही भारतात सिंधू संस्कृती मधील मूळनिवासी क्षत्रिय जमात असल्याचे प्राचीन अवशेषावरून लक्षात येते. प्राचीन काळात मातंग वंशाचा एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला राजवंश असला पाहिजे . असा निष्कर्ष ते अनेक पुराव्यासह मातंगाचा इतिहासाबद्दल प्रस्तुत ग्रंथात नोंदवतात. मांग हा शब्द कानडी व तेलुगू भाषेतील मंग शब्दाचे मराठी अपभ्रंश रूप असून वानर ह्या वंशाचे 'टोटेम ' असून दक्षिणेतील तुंगभद्रा नदीच्या तीर...

माणसाला जागं करणारा संग्रह : जागा हो मानवा | पुस्तक परिचय

इमेज
माणसाला जागं करणारा संग्रह - ‘जागा हो मानवा’       अभिव्यक्ती ही मानवी मनाची गरज आहे. अगदी गुहेत राहणारा माणूस सुद्धा आपल्या सृजनशीलतेचा वापर करून व्यक्त होत आला आहे. अजिंठा-वेरूळची अजरामर गुहाचित्रे त्याचंच उदाहरण आहेत. सुख-दुःख असेल किंवा आपल्या भोवतालच्या चांगल्या-वाईट गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींची नोंद सृजनशील माणूस आपल्या कलेतून घेत असतो. कोणी चित्रातून, कोणी गाण्यातून, नृत्यातून तर कोणी कविता व इतर साहित्य प्रकारातून समाजासमोर व्यक्त होत असतो. प्रत्येकाच्या व्यक्त होण्याचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. कोणी आनंदासाठी साहित्य निर्मिती करतो, तर कोणी समाजहिताचा उदात्त हेतू ठेवून साहित्याची निर्मिती करीत असतो. अलीकडे समाजहिताचा उद्देश घेऊन साहित्यनिर्मिती फार कमी प्रमाणात होत असते. मात्र अलीकडे वाचनात आलेला डॉ. माधव कुद्रे यांचा ‘जागा हो मानवा’ हा कवितासंग्रह समाजहिताचा उदात्त हेतू ठेवून समोर आलेला आहे. मानव कल्याणाचा उद्देश घेऊन डॉ. माधव कुद्रे आपल्या कवितेतून व्यक्त होत जातात. अशा कलाकृतीचा उद्देश जर मानव कल्याणाचा असेल, तर ती सर्वात सुंदर कलाकृती म्हणायला...