पोस्ट्स

सामाजिक लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

द स्टोनिंग ऑफ सोराया एम : स्त्रीशोषण, पुरुषसत्ता आणि माणुसकीचा खून

इमेज
    .... आणि पहिला दगड तिच्या पित्याने मारला  चार-पाच दिवसांपूर्वी एक चित्रपट पाहण्यात आला. तो ‘द स्टोनिंग ऑफ सोराया एम’ हा चित्रपट होता. यात एका स्त्रीला तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो, त्यामुळे सगळा समाज एकत्र येऊन सगळ्यांनी दगड मारून मारून तिला मृत्युदंड दिला जातो. त्यात पहिला दगड तिचा पिता मारतो. अशी ती एक सत्य कहाणी आहे. ‘द स्टोनिंग ऑफ सोराया एम’ हा चित्रपट केवळ एका स्त्रीला दगड मारून ठार केल्याची कथा नाही, तर निरापराध जीवावर होत असलेल्या अन्यायाला मान्यता देणाऱ्या पुरुषसत्ताक मानसिकतेचा पर्दाफाश करतो. सोरायाची कहाणी आपल्याला सांगते की स्त्रीशोषणाची सुरुवात पुरुषाच्या क्षुल्लक स्वार्थापासून होते. आणि त्याचं जालीम शस्त्र म्हणजे स्त्रीचं चारित्र्य संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे. अशा वेळी पुरुषाच्या शब्दाला पुराव्याशिवाय सत्य मानले जाते आणि स्त्रीच्या अस्तित्वालाच गुन्हा ठरवले जाते, तेव्हा अन्यायाला नैतिकतेचा मुखवटा मिळतो. गुन्हा नवऱ्याचा, शिक्षा बायकोला १९८६ मधील इराणच्या एका गावात घडलेल्या घटनेवर आधारित हा चित्रपट सोराया नावाच्या स्त्रीची शोकांतिका म...

वारी : भक्ती, समता मानवतेची शाळा | मराठी लेख

इमेज
 वारी : भक्ती, समता  मानवतेची शाळा  " जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया..."       वारकरी संप्रदायातील हा भावस्पर्शी स्वर केवळ अभंगातील शब्द नाही; तो लाखो वारकऱ्यांच्या अंतःकरणातील ओढ आहे. आपल्या विठू माउलीच्या दर्शनासाठी अनवाणी पायांनी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते त्याचे माहेर आहे. म्हणूनच दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक टाळ-मृदंगाच्या निनादात, अभंगांच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात पंढरीची वाट धरतात. संसाराचा गाडा ओढून दमलेल्या जीवावरचं सगळं ओझं उतरवून ठेवून मुक्तीची पताका खांद्यावर घेऊन पंढरिच्या वाटेवरून पावलं धावत सुटतात.     त्याच बरोबर सामाजिक दृष्टीने विचार केला तर, पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा, किंवा उत्सव नाही; तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे.   शेकडो वर्ष सुरू असलेल्या वारीत संतांच्या विचारांचा अमूल्य वारसा, समतेची शिकवण, शि...

स्त्रियांच्या शोषणावर उभी आहे मानवी कुटुंब व्यवस्था : एक सामाजिक वास्तव | मराठी लेख

इमेज
स्त्रियांच्या शोषणावर उभी आहे मानवी कुटुंब व्यवस्था : एक सामाजिक वास्तव  अलिकडेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं भाष्य केले आहे - "महिला या होम मेकर तर आहेतच त्याचबरोबर त्या  राष्ट्रनिर्मात्या आहेत.त्यांच्या श्रमाला मुल्य आहे."  उशिरा का होईना देशाच्या न्याय व्यवस्थेने महिलांचं महत्व अधोरेखित केले आहे, हेही नसे थोडके .          मानवी समाजाचा पाया कोणता?  असा जर प्रश्न विचारला तर त्याचे सर्वसाधारण उत्तर "कुटुंब" असे दिले जाते. कुटुंब ही केवळ राहण्याची व्यवस्था नाही; ती माणसाला प्रेम, सुरक्षितता, संस्कार, ओळख आणि सामाजिक स्थान, व प्रतिष्ठा देणारी संस्था आहे. प्रत्येक व्यक्तीचा पहिला समाज म्हणजे त्याचे कुटुंब. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेला मानवी संस्कृतीचा कणा मानले जाते. परंतु या कुटुंब व्यवस्थेकडे बारकाईने पाहिले, तर एक अस्वस्थ करणारे वास्तव समोर येते. कुटुंबव्यवस्था ही शतकानुशतके स्त्रियांच्या त्यागावर, श्रमांवर, सहनशीलतेवर, त्यांच्या स्वातंत्र्याच्या किंमतीवर  व्यवस्था उभी आहे.   हा  केवळ स्त्रीवादी विचार नाह...

कुटुंबातील भावनिक अंतर : एकाच घरात राहूनही दूर होत चाललेली माणसं

इमेज
कुटुंबातील भावनिक अंतर : एकाच घरात राहूनही दूर होत चाललेली माणसं            जगाच्या पाठीवर आपलं घर असणारी व्यक्ती भाग्यवान समजायला हवी.‌ घराचं महत्व त्यांना माहीत असतं ज्यांचं कुठेही घर नाही. मात्र ज्यांना घर आहे त्यात घरपण असेलच असे नाही.    ' घर ' या शब्दाचा अर्थ  केवळ दगड विटांच्या चार  भिंती असा होत नाही,  घर म्हणजे जगाच्या पाठीवर आपलं हक्काचं सुरक्षित ठिकाण असतं. त्यात राहणाऱ्या माणसांमधील जिव्हाळा, संवाद, समजूतदारपणा आणि भावनिक आधार या गोष्टी घराला घरपण देतात. घर ही अशी जागा असते, जगात कुठेही गेलो, पद, प्रतिष्ठा, कितीही मान मरातब मिळवला तरीही मनाला कायम घरी परतण्याची ओढ असते. घर अशी जागा असते जिथे आपण सुखाची झोप घेऊ शकतो. हे घरपण अलिकडे खिळखिळं होत चाललं आहे.       पूर्वी कुटुंबातील  सर्व लहान मोठी माणसं एकमेकांशी प्रत्यक्ष जोडून होती.   सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, एकत्र बसून मनमोकळ्या गप्पा व्हायच्या, खळखळून हसायचे, खरा हृदय संवाद व्हायचा.  सगळं आलबेल होतं असं ...

महिला दिन : उत्सव की स्त्रीमुक्तीचा अपूर्ण संघर्ष?

इमेज
महिला दिन : उत्सव की स्त्रीमुक्तीचा अपूर्ण संघर्ष? स्त्रियांनी आता माणूसपणाकडे वाटचाल करायला हवी,  याविषयी या लेखात चर्चा करणार आहोत.    तिच्या मुक्तीचा मूलभूत प्रश्न उत्सवांच्या गदारोळात हरवून जातो. दरवर्षी ८ मार्च आला की जगभरात महिलादिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सामाजिक माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो, स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो, विविध कार्यक्रम आयोजित केले जातात , स्त्रीशक्तीचे गुणगान केले जाते. कार्यालये, शाळा, संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये महिलांचा सत्कार केला जातो. परंतु या सर्व उत्सवांच्या गदारोळात एक अत्यंत मूलभूत प्रश्न बाजूलाच राहतो, आजही स्त्रीला समाजात पूर्णपणे “माणूस” म्हणून स्वीकारले गेले आहे का? स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो, तिच्या यशोगाथा सांगितल्या जातात, मात्र तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन खरोखर बदलला आहे का? अनेकदा स्त्री अजूनही आई, पत्नी, सून किंवा मुलगी या नात्यांच्या चौकटीतच मर्यादित दिसते. म्हणूनच आज स्त्रीमुक्तीचा खरा प्रश्न केवळ अधिकारांचा नाही, तर स्त्रीच्या माणूसपणाच्या स्वीक...

अर्ध्या मानवसमुहा विरोधातील सर्वात मोठे कारस्थान .

इमेज
     अर्ध्या मानवसमुहा विरोधातील सर्वात मोठे कारस्थान  .      भारतीय समाजात स्त्रीविरोधी अन्यायांची चर्चा जेव्हा होते, तेव्हा बहुतांश वेळा शारीरिक हिंसा, हुंडा, कौटुंबिक छळ, लैंगिक अत्याचार किंवा सामाजिक निर्बंध यांसारख्या दृश्य अदृश्य  घटनांवर कधी बोलले जाते तर  जास्त वेळा दडपले जाते .  सर्वच प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करताही येणार नाही. मात्र या सगळ्या अन्यायाच्या मुळाशी असलेल्या कारणांवर चुकूनही बोलले जात नाही.  सर्व प्रकारच्या शोषणाला कारणीभूत असलेले व या सगळ्या गोष्टींचे आतून पोषण, करणाऱ्या मुळ कारणावर  त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या आणि पिढ्यान्‌पिढ्या पुढे पुढे सुरूच  असलेल्या अन्यायावर  मौन बाळगले जाते . ती गोष्ट  म्हणजे स्त्रीला मालमत्तेपासून पद्धतशीरपणे दूर ठेवणं. हीच गोष्ट  स्त्रीचं संपूर्ण आयुष्य आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित बनवते.   पुरूष सत्ताक व्यवस्थेने स्त्रियावर  हा अन्याय परंपरेच्या नावाखाली लादला व समाज मान्यताही मिळवून घेतली...

फुटलेली बरणी : अनित्यतेचा स्वीकार व जगण्याचा अर्थ .

इमेज
फुटलेली बरणी : अनित्यतेचा स्वीकार व जगण्याचा अर्थ         आज सकाळी सकाळी नाश्ता बनविण्याच्या घाईत हातातून निसटलेल्या मिठाच्या बरणीचे फरशीवर तुकडे तुकडे होऊन विखुरले. मला त्या बरणीचं झाकण खूप आवडलं होतं, म्हणून मी तिला खूप जपत होते. ती एका क्षणात काचेच्या असंख्य तुकड्यांत रूपांतरित झाली . हळहळ करीत सगळ्या काचा भरून कचऱ्यात टाकल्या. पण त्या काचाही टाकाव्याशा वाटत नव्हत्या. त्या सुंदर झाकणाला मिनिटभर हातात घेऊन निरखत राहिले. खरं तर त्या झाकणामुळेच ती बरणी घेतली होती. आता झाकण हातात होतं, पण ज्यासाठी ते होतं ती बरणी नव्हती. काही गोष्टींचं असंच असतं. आपण ज्या गोष्टीवर जीव लावतो, तीच एखाद्या क्षणी हातातून निसटून जाते. मागे फक्त आठवणी उरतात आणि हातात काहीच राहत नाही. अशा कितीतरी बरण्या क्षणात फुटून काचेत रूपांतरित होतात. त्यात नेहमी मीठच असेल असं नाही. कधी त्यात छोटी छोटी सुंदर स्वप्नं असतात. मनाच्या कप्प्यात अलगद अनेक वर्षे जपून ठेवलेली. कधी त्यात नाजूक भावना असतात. एका चुकीच्या शब्दानेही तडकणाऱ्या. कधी आपण ठरविलेली ध्येयं असतात. त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट असता...

शिव्यांच्या मागचं राजकारण | लेख

इमेज
 शिव्यांच्या मागचं राजकारण आणि गुलाम मानसिकता      जेव्हा राग व्यक्त करायचा असतो तेव्हा शिव्या दिल्या जातात असं ढोबळ मानाने मानलं जातं. मात्र शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या मानसिकतेमागे फक्त एवढंच आहे का ?  तर असं मुळीच नाही . या मागे जाणीवपूर्वक केलेली कृती आहे . एखाद्या घटकांला अपमानित करून तो कसा त्याचा आत्मसन्मान जखमी करण्यासाठी केला जातो . ज्यांच्या विरोधात शिव्याचा वापर केला जातो त्याच्यावर आपलं वर्चस्व , श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी शिव्यांचा वापर केला जातो . समोरच्या घटकाचं दमन करण्यासाठी याचा वापर केला जातो . समोरच्या घटकाच्या माणूसपणाचं , चारित्र्याचं हनन करण्याचा उद्देश असतो .     या सगळ्या मागे शोषण व्यवस्थेची शोषक मानसिकता कार्य करते. या सर्व शिव्या महिलांना अपमानित करणाऱ्या असतात . आणि आजच्या तथाकथित सुशिक्षित सभ्य समाजात त्या सर्रासपणे वापरल्या जातात .  मानव समुहाच्या पन्नास टक्के भागाला अपमानित करताना थोडाही विचार केला जात नाही . किंवा ते चुकीचं आहे असंही वाटत नाही .  मानवाने एवढं नवनिर्माण केलं मात्र शि...

//स्त्रीदास्य काल आणि आज//

इमेज
स्त्रीदास्य - काल आणि आज भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. न्याय, समता आणि शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावे आणि ते हजारो वर्षे टिकून राहावे ही अतिशय खेदाची बाब आहे. शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे भेदावर आणि शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणे हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात आहे. मातृसंस्कृतीचा काळ आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा आपल्या जन्माला फक्त माता कारणीभूत आहे असा त्याचा समज होता. शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्याने स्त्रियांमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे अशी मान्यता होती. त्यामुळे मातृसंस्कृतीत स्त्रियांचे वर्चस्व सर्वांना मान्य होते. स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती. तिला गणिका असे संबोधले जात होते. गणिका म्हणजे गणाची मालकीण, आपल्या जमिनीचे आपल्या कुळात समान वाटप करणारी गणराणी. आम्रपाली सुद्धा अशीच एक गणराणी होती. ती समानतेच्या आणि लोकशाहीच्या तत्त्वावर शासन चालवत असे. त्यामुळेच गौतम बुद्धांनी अनेक राजपुत्रांच्या जेवणाचे निमंत्रण न स्वीकारता आम्रपालीचे निमंत्र...

वृत्ती -प्रवृत्ती / कुणासमोर आपलं मन मोकळं करण्याआधी जरूर वाचा.

इमेज
वृत्ती - प्रवृत्ती           दिल खोल दोगे  यारों के सामने तो  नहीं खोलना पडेगा औजारो के सामने        यासारखे अनेक मेसेज दररोज सकाळी सकाळी आपल्या फोनवर  येत असतात. त्यात  माणसाला माणसाशी जोडण्याचा विचार असतो. माणूस एकटा पडत चालला आहे, मित्रपरिवार नातेवाईक यांच्याशी जवळीक निर्माण व्हायला हवी असा आशय असतो . आतले कोवळे मन हे विचार वाचून भावविभोर होते.  एखाद्या अस्वस्थ क्षणी ते विचार आठवतात आणि आपण आपल्या जवळच्या वाटणाऱ्या  व्यक्तीजवळ जी आपल्या नजरेत थोडीफार जबाबदारही असते आपलं मन मोकळं करतो .     मनाचा निचरा झाल्याने काही वेळासाठी हलकंही वाटतं.   मात्र ज्या व्यक्तीला आपण आपल्या खाजगी जीवनातील सुखदुःख सांगितलेले असते ते ती व्यक्ती त्याच्याच जवळ न ठेवता सगळीकडे सांगत सुटली तर मात्र मनस्ताप अजून जास्त वाढतो .  हे झालं कुणासमोर आपलं मन मोकळं करणाऱ्याच्या भावनांचा आपल्या गॉसिपसाठी मसाला म्हणून वापर करणाऱ्यासंबंधित .      दुसरा प्रकार असाही असतो की , एखाद्याच्या...

व्हाया मणिपूर: आपण खरंच माणूस आहोत का? - माणुसकीच्या शोधातला आक्रोश

इमेज
              सुचना: हा लेख केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून लिहिला आहे          खरंच आपण माणूस आहोत ? माणूस असलोच तर माणसाची जात ही प्राण्यातील सर्वश्रेष्ठ जात असू शकते ?  हेच प्रश्न सतत डोक्यात फिरत आहेत . याला कारण म्हणजे मणिपूरमधील जळत्या जातीय दंगलीत  महिलांची झालेली सामूहिक विटंबना. प्राण्यांमध्ये असलं कौर्य पहाण्यात येत नाही . मग उगाच आपण त्या पशूंना नावं ठेवतो .        सोशल मीडियावर मणिपूरमधील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे फोटो ,थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल झाले , ते बघून  लकवा मारावा तसं मन , विचार, मेंदू सगळं सुन्न झालं . या घटनेने मानवतेची हत्या केली आहे .     पुर्वीपासूनच या देशात स्त्रियांची विटंबना होत आलेली आहे . द्रौपदी , सीता , अहिल्या , वृंदा , तारका , शुर्फणका , स्तनकराच्या विरुद्ध बंड करून स्वतःचे स्तन कापून हौतात्म्य पत्करणारी नांगेली , अगदी अलीकडे स्वतःच्या झालेल्या विटंबनेचा बदला घेत बॅन्डिड क्वीन म्हणून नावारूपाला आलेली  फुलनदेवी  ...